गारपिटीच्या शास्त्रोक्त अभ्यासाची गरज : डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी; ४ दिवस आधी अंदाज शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:20 PM2018-02-21T13:20:39+5:302018-02-21T13:23:15+5:30

गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यात एकावेळी मोठ्या भूभागावर गारपिटीचे संकट येऊ लागले आहे़ त्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे़ त्याचा शास्त्रोक्त अभ्यास होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी केले.

Need for scientific study of hailstorm : Dr. JeevanPrakash Kulkarni; forecast 4 days before possible | गारपिटीच्या शास्त्रोक्त अभ्यासाची गरज : डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी; ४ दिवस आधी अंदाज शक्य

गारपिटीच्या शास्त्रोक्त अभ्यासाची गरज : डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी; ४ दिवस आधी अंदाज शक्य

Next
ठळक मुद्देसिमला आॅफिस वेधशाळेत डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांचे व्याख्यानफेब्रुवारीत वातावरण थंड असल्याने त्या थेट वेगाने जमिनीवर कोसळून करतात मोठे नुकसान

पुणे : गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यात एकावेळी मोठ्या भूभागावर गारपिटीचे संकट येऊ लागले आहे़ त्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे़ त्याचा शास्त्रोक्त अभ्यास होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी केले़ 
राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या गारपीटीबाबत डॉ़ कुलकर्णी यांचे व्याख्यान सिमला आॅफिस वेधशाळेत आयोजित करण्यात आले होते़ डॉ़ कुलकर्णी म्हणाले, की २०१४ पासून प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या भूभागावर गारपीट होत आहे़ ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान राज्यात ३ ते ४ हजार हेक्टर आणि २०० तालुक्यांमध्ये ही गारपीट झाली़ अजूनही गारपीट मोजण्याचे कोणतेही साधन आपल्याकडे नाही़ ही गारपीट सकाळच्या वेळी झाली़ वातावरण थंड असल्याने या गारा अनेक तास तशाच होत्या़ उन्हाळ्यातही आपल्याकडे वळवाच्या पावसाबरोबर गारांचा पाऊस होतो़ पण, तो सायंकाळच्या वेळी होऊन या गारा उष्म्यामुळे लगेच वितळतात़ उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालचा उपसागर, अरबी समुद्रावरून येणारे वारे एकमेकांशी भिडल्याने त्यातील बाष्प मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन त्यांचे हिमकणात रूपांतर होते़ खालून हवेचा दाब असल्याने त्यांचे एकमेकांवर थर तयार होतात़ त्या जड झाल्यावर एखादा भागातून त्या खाली कोसळतात़
फेब्रुवारीत वातावरण थंड असल्याने त्या हवेत न वितळता थेट वेगाने जमिनीवर कोसळून मोठे नुकसान करतात़ गारा यांचे एकूण ११ प्रकार असतात़ 
पण, त्याबाबत अजूनही लोकांपर्यंत आवश्यक ती जनजागृती झालेली नाही़ या गारा कधी, कोठे, किती वेळ आणि त्यांची जाडी किती होती याची माहिती लोकांनी नोंदवून ठेवून हवामान विभागाला कळविली तर डाटा तयार होऊ शकतो़ त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Need for scientific study of hailstorm : Dr. JeevanPrakash Kulkarni; forecast 4 days before possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.