विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्याधारित शिक्षणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:11 AM2021-02-14T04:11:42+5:302021-02-14T04:11:42+5:30
येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय बी. व्होक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘फुड प्रोसेसिंग अँड क्वालिटी मॅनेजमेंट’ कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ...
येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय बी. व्होक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘फुड प्रोसेसिंग अँड क्वालिटी मॅनेजमेंट’ कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभिमन्यू काळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के. जी. कानडे होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. ए. बी. निकुंभ, कार्यशाळेचे समन्वयक प्रा. व्ही. एस. कुमावत, घोडेगाव येथील बी. डी. काळे महाविद्यालयाचे प्रा. सोपान मंडलिक उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. के. जी. कानडे म्हणाले, शिक्षण पद्धतीमध्ये कौशल्याधारित शिक्षणाची गरज लक्षात घेऊन महाविद्यालयाने बी. व्होक कोर्सेस सुरू केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल’. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना टोमॅटो प्रोसेसिंग, चिंच प्रोसेसिंग, आवळा प्रोसेसिंग इत्यादीची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अभिमन्यू काळे यांनी सविस्तर उत्तरे दिली, यावेळी तेजस पगारे आणि वैष्णवी टेमकर या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्वप्ना जोशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन सुसे यांनी केले तर आभार प्रा. करूणा पाटील यांनी मानले.