घाट रस्त्यांचे सर्वेक्षण होण्याची गरज
By Admin | Published: July 29, 2015 12:13 AM2015-07-29T00:13:41+5:302015-07-29T00:13:41+5:30
घाट रस्त्यावरून जाणा-या जड वाहनांमुळे रस्त्या लगतच्या दरडी कंपन पावतात. त्याच प्रमाणे काही वर्षांनंतर या दरडींना उन आणि पाऊसामुळे भेगा पडतात. तसेच खडकांमधील ‘जॉईट’
पुणे : घाट रस्त्यावरून जाणा-या जड वाहनांमुळे रस्त्या लगतच्या दरडी कंपन पावतात. त्याच प्रमाणे काही वर्षांनंतर या दरडींना उन आणि पाऊसामुळे भेगा पडतात. तसेच खडकांमधील ‘जॉईट’ कालांतराने वेगळे होत जातात होत जातात. त्यामुळे राज्यातील सर्वच घाट रस्त्याचे सर्वेक्षण केले आणि त्याचा सखोल अभ्यास करून त्यावरील उपाययोजना केल्या तर दरड कोसळून होणारे अपघात टाळता येतील,या संदर्भातील अहवाल भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातर्फे (जीएसआय)राज्य शासनाला सादर केला जाणार आहे.
पुणे मुंबई महामार्गावर आडोशी बोगद्या जवळ दरड कोसळून झालेल्या अपघाताची पाहणी जीएसआयचे भुस्खलन विभागाचे संचालक डॉ. मकरंद बोडसे केली होती. कोणत्या कारणामुळे दरड कोसळली, या पुढील काळात अशा दरडी कोसळू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. महामार्गावरील काही भागात दरड कोसळण्याची शक्यता आल्याने सध्या त्यादृष्टीने डागडुजीचे काम केले जात आहे. रस्त्यावर दरड कोसळू नये,यासाठी शासनाने कोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबत बोडसे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
केवळ आडोशी बोगद्या जवळ झालेल्या अपघाताकडे पाहून चालणार नाही. तर राज्यातील सर्वच रस्त्यांचा या निमित्ताने विचार झाला पाहिजे, असे नमूद करून बोडसे म्हणाले, घाट रस्त्यांवर दरडी कोसळू नये म्हणूनच तेथे जाळ्या बसविल्या जातात. परंतु, रस्त्यालगत बसविलेल्या जाणा-या जाळ्यांची डिझाईन, त्यांची क्षमता यांचाही करायला हवा. जड वाहनांमुळे सतत कंपन बसून दरडींमधील भेगा वाढत जातात. त्यात पावसाचे पाणी गेल्याने मातीचा आणि दगडाचा ढीगारा रस्त्यावर कोसळतो. जाळ्या मातीचा किती टन बोजा सांभाळू शकतात, त्या किती वर्षांनी बदलणे अपेक्षित आहे, याची तपासणी व्हायला हवी.
(प्रतिनिधी)