ज्ञानक्षेत्रात नव्याने विचार करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:12 AM2021-01-25T04:12:23+5:302021-01-25T04:12:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: आज साहित्य किंवा तंत्रज्ञान कोणतेही क्षेत्र असो, भारतात प्रयोग किंवा संशोधन होताना दिसत नाही. ...

The need to think anew in the field of knowledge | ज्ञानक्षेत्रात नव्याने विचार करण्याची गरज

ज्ञानक्षेत्रात नव्याने विचार करण्याची गरज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: आज साहित्य किंवा तंत्रज्ञान कोणतेही क्षेत्र असो, भारतात प्रयोग किंवा संशोधन होताना दिसत नाही. पाश्चात्य देशात अस्तित्ववाद किंवा वास्तववादाचे वारे आले की, तोच प्रवाह, प्रघात भारतीय साहित्यात दिसायला लागतो, यापेक्षा भारतात साहित्यिकांनी आणि तंत्रज्ञानांनी ज्ञान क्षेत्रात नव्याने विचार करण्याची गरज आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.

अथर्व पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे लिखित ‘चाैकट’ या कथासंग्रहाचे प्रकाशन डाॅ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पी. डी. पाटील हे होते. या वेळी व्यासपीठावर पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका सायली वांजळे-शिंदे, नगरसेविका लक्ष्मी दुधाने आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, समाजाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध होत नाही, तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. पूर्वी समाजाचे नेतृत्व करणारे लोक हे साहित्यिक मनाचे होते. य़शवंतराव चव्हाण हे सर्वात मोठे उदाहरण आपल्याला माहिती आहे. परंतु कालांतराने झटपटच्या नादात साहित्य वाचन, विवेचन, मनन, चिंतन, चर्चा आदी गोष्टींना दुय्यम स्थान देऊन राजकीय नेतृत्व पुढे येऊ लागले. यामुळे साहित्य वाचनातून जी समज येते, विचारांना खोली प्राप्त होते त्याचा अभाव दिसू लागला. राजकारणाच्या धबडग्यात राहूनही जी राजकीय व्यक्ती त्याच्या साहित्यिक जाणिवा जागृत ठेवते, तिला सर्वच ठिकाणी मान-सन्मान मिळतो.

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, लेखक, साहित्यिक हे समाजाचे दिशादर्शक असून, समाजाला शहाणे करुन सोडण्याचे काम ते करीत असतात. अशा समर्पित साहित्यिकांमुळेच समाज भरकटण्यापासून वाचतो.

लेखक वि.दा पिंगळे यांच्यासह मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दिीपाली धुमाळ आणि नगरसेविका सायली वांजळे-शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

.....

Web Title: The need to think anew in the field of knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.