आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीच्या दृष्टीने धावपट्टी वाढविण्यासाठी सर्वेक्षण करण्याची गरज-चंद्रकांत पाटील

By अजित घस्ते | Published: October 5, 2023 07:40 PM2023-10-05T19:40:49+5:302023-10-05T19:41:06+5:30

पुणे : पुणे विमानतळ येथे नवे टर्मिनल सुरू झाल्यानंतर देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूकीच्या गरजेनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून ...

Need to conduct a survey to increase the runway for international aviation - Chandrakant Patil | आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीच्या दृष्टीने धावपट्टी वाढविण्यासाठी सर्वेक्षण करण्याची गरज-चंद्रकांत पाटील

आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीच्या दृष्टीने धावपट्टी वाढविण्यासाठी सर्वेक्षण करण्याची गरज-चंद्रकांत पाटील

googlenewsNext

पुणे :पुणे विमानतळ येथे नवे टर्मिनल सुरू झाल्यानंतर देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूकीच्या गरजेनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीच्यादृष्टीने धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी सर्व पैलूंचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व्यक्त केले.  पुणे विमानतळ येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे पुणे विमानतळ व्यवस्थापक संतोष ढोके इ. उपस्थित होते.

यापुढे पाटील म्हणाले, भविष्याच्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक वाढविण्यासाठीही प्रयत्न करावे लागतील. त्यादृष्टीने आवश्यक अभ्यास करण्यात यावा. पुरंदर विमानतळाच्या कामाला गती देण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. तसेच नव्या टर्मिनलसाठी आवश्यक रस्त्याच्या कामालाही गती द्यावी असे निर्देश ही देण्यात आले. 

यावेळी पुणे विमानतळ व्यवस्थापक संतोष ढोके यांनी पुणे विमानतळ येथील विमान सेवेबाबत माहिती दिली. पुणे विमानतळ येथून दररोज सुमारे तीस हजार प्रवासी प्रवास करतात, त्यातील  सुमारे ५४० आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत. २०२२-२३ मध्ये ५९ हजार ४५१ विमानफेऱ्यांद्वारे ८० लाख प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला आहे .या वर्षी  सप्टेंबरपर्यंत ३१ हजार ५९१ विमानफेऱ्यांद्वारे ४७ लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. नवे टर्मिनल सुरू झाल्यावर ही संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Need to conduct a survey to increase the runway for international aviation - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.