देहविक्रिय करणाऱ्या वयोवृद्ध महिलांसाठी काम करण्याची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:37 AM2020-11-22T09:37:35+5:302020-11-22T09:37:35+5:30
किशोर चव्हाण : देवदासींसोबत भाऊबीज \Sपुणे : बुधवार पेठेसारख्या देहविक्रीय करणाऱ्या महिलांचे वय वाढल्यानंतर त्यांना आरोग्य, दोन वेळचे पोट ...
किशोर चव्हाण : देवदासींसोबत भाऊबीज
\Sपुणे : बुधवार पेठेसारख्या देहविक्रीय करणाऱ्या महिलांचे वय वाढल्यानंतर त्यांना आरोग्य, दोन वेळचे पोट भरण्याची भ्रांत जाणवते. ती दूर करण्याचे काम करण्याची गरज असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख किशोर चव्हाण यांनी व्यक्त केले.
जनता वेल्फेअर सोसायटी व प्रभात मित्र मंडळ गुरुवार पेठ यांच्यातर्फे देवदासी महिलांची आपुलकीची भाऊबीज या कार्यक्रमाचे आयोजन शेटे मारुती मंदिर येथे करण्यात आले. यावेळी विजय शिवाजी मित्र मंडळाचे राजाभाऊ पवार, महाराष्ट्र तरुण मंडळाचे हनुमंत शिंदे, सोसायटीचे शरद शिंदे, विजय धोत्रे, मंडळाचे राजेंद्र भूतकर, केतन भागवत, मनोज शेलार, गौरव मयेकर, कुणाल जगताप आदी उपस्थित होते. देवदासी महिलांना 24 प्रकारचे साहित्य असलेले फराळ व धान्याचे किट देण्यात आले.