आॅनलाइन सुविधेचा उडाला बोजवारा, कर्जमाफीच्या सुविधेला मुकावे लागणार? मुदतवाढ देण्याची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 02:08 AM2017-09-16T02:08:51+5:302017-09-16T02:09:17+5:30

 Needless to say that the facility of online facility will be waived, debt waiver? Demand for extension | आॅनलाइन सुविधेचा उडाला बोजवारा, कर्जमाफीच्या सुविधेला मुकावे लागणार? मुदतवाढ देण्याची मागणी 

आॅनलाइन सुविधेचा उडाला बोजवारा, कर्जमाफीच्या सुविधेला मुकावे लागणार? मुदतवाढ देण्याची मागणी 

Next

भोर : कर्जदार शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर होती. मात्र पुरेशा प्रमाणात अर्ज न भरल्याने ती मुदत २२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत ११ हजार ५८२ कर्जदार शेतक-यांपैकी ९०२९ शेतक-यांचे अर्ज भरले आहेत. त्यामधील ७५१४ शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज पूर्णपणे भरुन झाले आहेत. मात्र वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि सुविधांचा अभाव यामुळे शिवाय कागदपत्रे नसणारे, वृद्ध अपंग हातांचे ठसे जुळत नाहीत, बाहेरगावी राहतात असे सुमारे एक हजार शेतकरी शासनाच्या कर्जमाफीला मूकणार आहेत.
शासनाने राज्यातील २०१६ पर्यंत दीड लाख रु. थकि त कर्ज असलेल्या शेतक-यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय घेतला. तर नियमित कर्ज फेडणाºयांना २५ टक्के कर्जमाफी मिळणार आहे. मात्र दीड लाखांपेक्षा अधिक क र्ज असल्यास ते भरल्यावरच बाकीची कर्जमाफी होणार आहे. शेतकºयांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आॅनलाईन महिती भरायची असून त्यासाठी आधार कार्ड, कर्जखाते क्रमांक, मोबाईल नंबर व इतर पुरावे केंद्रात द्यावयाचे आहेत. मात्र आॅनलाईनचा उडालेला बोजवारा यामुळे दिवसभर रांगा लावून बसावे लागत आहे.
भोर तालुका हा दुर्गम डोंगरी असून तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी अशिक्षित आहेत. त्यामुळे आॅनलाईन सेवा काय असते, अर्ज कसा भरायचा, याबाबत काहीच महिती नाही. शिवाय आॅनलाईन सेवा अत्यंत सथ गतीने सुरूअसून अनेकदा बंदच असते. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे सुमारे ५० ते ६० किलोमीटर अंतरावरुन २०० रुपये खर्च करुन आलेल्या शेतकºयाचा अर्ज भरला गेला नाही, तर त्याला पुन्हा यावे लागत असल्याने विनाकारण भुर्दंड बसत आहेत. जिल्हा बँक व तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव यांनी शेतकºयांना कर्जमाफीबद्दल महिती देऊन शेतकºयांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाहीत. शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या कर्ज माफीचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र असून अनेक शेतकरी कामानिमित्त पुणे मुंबईला राहतात. हातांचे ठसे जुळत नाहीत, कागदपत्रे नाहीत. त्यामुळे तालुक्यातील सुमारे एक हजार शेतकरी कर्जमाफीला मूकणार असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
भोर तालुक्यातील अल्पभूधारक (५ एकरच्या आत) असलेल्या ६७१९ शेतकरी सभासदांनी सुमारे ३४ कोटी ८९ लाख रुपये वेगवेगळ््या पिकांसाठी पिक कर्ज घेतले होते.

भोर तालुक्यात १९७ गावांत खरीप व रब्बी पिकांसाठी ७५ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा बँकेचे सुमारे २२ हजार ७४२ सभासद आहेत. त्यांना दरवर्षी सुमारे ३ लाखापर्यंतचे अल्पमुदतीचे पीककर्ज व मध्यम मुदतीचे बिनव्याजी कर्ज वाटप केले जाते. यावर्षी भोर तालुक्यातील ११ हजार ४४७ शेतकरी सभासांनी सुमारे ४५ कोटी ३२ लाखांचे कर्ज थकवले आहे. मात्र सुमारे ८०३६ सभासदांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून घेतलेले सुमारे ५१ कोटीचे पीककर्ज ३१/३/२०१७ रोजी वेळेत भरलेले आहे. त्यांना कर्जाचे २५ टक्के माफी मिळणार आहे.

शेतकºयांना कर्जमाफीसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरुन माहिती द्यायची आहे. याबाबत शेतकºयांना माहिती नसून अनेक शेतकरी अशिक्षित आहेत. त्यामुळे शेतकºयांत संभ्रमावस्था आहेत. अनेक शेतकरी आजारी आहेत. कागदपत्रे नाहीत. त्यामुळे मुदतवाढ करणे गरजेचे आहे.
- सुरेश राजिवडे, शेतकरी, म्हसर खुर्द

Web Title:  Needless to say that the facility of online facility will be waived, debt waiver? Demand for extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी