पक्षी वैविध्य जपण्याची गरज : अनिल महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 07:23 PM2018-07-12T19:23:13+5:302018-07-12T19:33:38+5:30

२०१२ च्या पक्षीगणनेनुसार त्यांची संख्या २५ हजार असल्याचे लक्षात आले. मात्र,अभयारण्य नसल्याने आणि मासेमारी, गाळ वाढणे, निसर्ग कमी होणे, प्रदूषण अशा येथील जैववैविध्य धोक्यात येऊ शकते.’ 

needs birds Diversity : Anil Mahajan | पक्षी वैविध्य जपण्याची गरज : अनिल महाजन

पक्षी वैविध्य जपण्याची गरज : अनिल महाजन

googlenewsNext
ठळक मुद्देपाणथळ क्षेत्राच्या धर्तीवर पक्षी जैववैविध्य असणाऱ्या पाणथळ क्षेत्रांना जागतिक संरक्षित दर्जा हतनूर हे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित होण्याची गरजवेंगुर्ला रॉक, मेहुल शिवडी, नांदूर मध्यमेश्वर (नाशिक ), ठाणे क्रिक, लोणार ही पाणथळे संरक्षित

पुणे : ‘भुसावळ जवळील हतनूरच्या धरणाच्या पाणथळ क्षेत्रात २५ हजारांहून अधिक पक्षी, २८० प्रजाती सापडतात. त्यामुळे पाणथळ जागांसाठी जागतिक  पातळीवरचा ‘रामसर साईट’ चा दर्जा मिळवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच, हतनूर हे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित होण्याची गरज आहे’, असे मत पक्षी निरीक्षक अनिल महाजन यांनी व्यक्त केले. हतनूरप्रमाणे उजनी येथेही पक्षी वैविध्य आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे तेथेही पक्षी अभयारण्य घोषित होऊ शकले नाही, अशी खंतही महाजन यांनी व्यक्त केली . 
 जीविधा, देवराई फाऊंडेशन, निसर्गसेवक या संस्थांच्या वतीने निसर्ग अभ्यासक आणि पक्षीनिरीक्षक अनिल महाजन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे झालेल्या व्याख्यानात महाजन बोलत होते. अनिल महाजन आणि त्यांचे सहकारी राणा राजपूत यांचा उष:प्रभा पागे, डॉ. विनया घाटे, धनंजय शेडबाळे, राजीव पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
महाजन म्हणाले, ‘१९८० च्या दशकापासून हतनूर धरणाच्या परिसरात तापी, पूर्णा नद्यांच्या संगमामुळे पाणथळ क्षेत्र तयार झाले. परदेशातूनही येथे ‘रेड फलरोप’ सारखे दुर्मिळ स्थलांतरित पक्षी येऊ लागले. येथे २८० प्रकारचे पक्षी दिसू लागले. २०१२ च्या पक्षीगणनेनुसार त्यांची संख्या २५ हजार असल्याचे लक्षात आले. मात्र,अभयारण्य नसल्याने आणि मासेमारी, गाळ वाढणे, निसर्ग कमी होणे, प्रदूषण अशा येथील जैववैविध्य धोक्यात येऊ शकते.’ 
हतनूरचे जैववैविध्य राखण्यासाठी हे क्षेत्र पक्षी अभयारण्य होणे आवश्यक आहे. अभयारण्य झाले की येणाऱ्या संभाव्य बंधनांना स्थानिकांचा विरोध आहे. राजकारण्यांची अनास्था आहे. इराणच्या ‘रामसर’ पाणथळ क्षेत्राच्या धर्तीवर पक्षी जैववैविध्य असणाऱ्या पाणथळ क्षेत्रांना जागतिक संरक्षित दर्जा दिला जातो. तसा दर्जा हतनूरला मिळण्यासाठी राज्य, केंद्र सरकारने प्रस्ताव करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत जनजागृती होणे गरजेचे आहे.
जायकवाडी, वेंगुर्ला रॉक, मेहुल शिवडी, नांदूर मध्यमेश्वर (नाशिक ), ठाणे क्रिक, लोणार ही पाणथळे संरक्षित आहेत. मात्र, नवेगाव, उजनी, हतनूरसारखी पाणथळे अजून संरक्षित होऊ शकली नाहीत, असेही ते म्हणाले. 
राजीव पंडीत यांनी प्रास्तविक केले. धनंजय शेडबाळे यांनी आभार मानले. 

Web Title: needs birds Diversity : Anil Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.