गरजूंना आरक्षण मिळायलाच हवे
By admin | Published: October 5, 2016 12:53 AM2016-10-05T00:53:58+5:302016-10-05T00:53:58+5:30
ज्या समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे, अशा गरजवंत समाजाला नक्कीच आरक्षण मिळावे, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
पिंपरी : ज्या समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे, अशा गरजवंत समाजाला नक्कीच आरक्षण मिळावे, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र परीट समाज युवा संस्थेच्या वतीने आचार्य अत्रे नाट्यगृहामध्ये झालेल्या परीट (धोबी) आरक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
उपजिल्हाधिकारी संजय कदम, उद्योजक रमाकांत कदम, अॅड. वीरेंद्र वाघमारे, दीपक सपकाळ, मुख्य संयोजक परीट समाज युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष भालेकर, तुकाराम दळवी, राजाराम रसाळ, संजय पवार, परीट समाजाचे शहराध्यक्ष रामदास जाधव, महिलाध्यक्षा वैशाली राऊत, लाँड्री संघटनेचे शहराध्यक्ष सुनील पवार, विशाल जाधव, बंशी पारडे आदी उपस्थित होते.
भालेकर म्हणाले, ‘‘राज्यातील परीट समाज ओबीसीमध्ये गणला जातो. समाजाला १९६०पूर्वीचे अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे. २००२मध्ये डॉ. दशरथ भांडे आयोग लागू केल्यास पूर्वीचे अनुसूचित जातीचे आरक्षण मिळेल. यामुळे या परिषदेचे आयोजन केले आहे.’’
संजय पवार सूत्रसंचालन केले, हेमंत ननावरे, शशिकांत दळवी, अमोल भालेकर, आनंद दळवी, विजय बुतकर, गजानन राऊत, सचिन कदम यांनी संयोजन केले.