कालवा दुर्घटनेची चौकशी एका महिन्यात करावी - नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 02:32 AM2018-09-30T02:32:46+5:302018-09-30T02:33:01+5:30

दांडेकर पुलाजवळील मुठा उजवा कालवा फुटल्याच्या दुर्घटनेची चौकशी एका महिन्यात पूर्ण करावी, तसेच या घटनेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी

Neelam Gorha: To inquire about the canal disaster in one month | कालवा दुर्घटनेची चौकशी एका महिन्यात करावी - नीलम गोऱ्हे

कालवा दुर्घटनेची चौकशी एका महिन्यात करावी - नीलम गोऱ्हे

Next

पुणे : दांडेकर पुलाजवळील मुठा उजवा कालवा फुटल्याच्या दुर्घटनेची चौकशी एका महिन्यात पूर्ण करावी, तसेच या घटनेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी. त्याचप्रमाणे दुघर्टनेनंतर आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून न देणाºया पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचीसुद्धा चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या व आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली.

मुठा उजवा कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोºहे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भटे घेऊन प्रशासनातर्फे केल्या जाणाºया कामांची माहिती घेतली. त्यानंतर गोºहे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, समन्वयक किशोर राजपूत, विभागप्रमुख सूरज लोखंडे, अनंत घरत, तानाजी लोकरे आदी उपस्थित होते.
गोºहे म्हणाल्या, कालवा दुघर्टनेमध्ये ज्या नागरिकांची कागदपत्रे पाण्यात वाहून गेली आहेत, त्यांना आवश्यक कागदपत्रे परत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘समाधान शिबिरा’चे आयोजन करावे, तसेच बाधितांना अन्न, धान्य वितरण विभागाकडून घरपोच किंवा पुनर्वसन केलेल्या ठिकाणी आवश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात. गहू किंवा तत्सम धान्य न देता थेट पीठ दिले जावे.
त्यावर जिल्हाधिकाºयांनी गोºहे यांच्या मागण्या मान्य करत संबंधित अधिकाºयांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

४जिल्हा प्रशासनाने कालवा फुटल्याने झालेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत.तसेच जिल्हा प्रशासनातर्फे बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी खास बाब म्हणून ३ कोटी रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नीलम गोºहे यांनी दिलेल्या निवेदनानुसार चौकशी करून अहवाल तयार करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

Web Title: Neelam Gorha: To inquire about the canal disaster in one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे