"सूर्य कायमचा संपला..." जे.पी. नड्डा यांना नीलम गोऱ्हे यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 02:26 PM2022-08-01T14:26:01+5:302022-08-01T14:26:09+5:30
देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही
पुणे : देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व पक्षही संपतील, देशात केवळ भाजप राहील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येथे केला होता. यावर विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेचे उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या, की जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा रात किड्यांना अस वाटत की सूर्य हा कायमचा संपला आहे. पण सकाळ झाल्यावर त्यांच्या ते लक्षात येत. असा टोला यावेळी गोऱ्हे यांनी जे. पी. नड्डा यांना लगावला आहे. पुण्यात अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी त्या बोलत होते.
अशा लोकांना बोलायचं अधिकार नाही
खासदार संजय राऊत यांच्या अटकेबाबत नीलम गोऱ्हे यांना विचारल असता त्या म्हणाल्या, कुठल्याही व्यक्ती बाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना म्हणजेच तपास सुरू असताना मत व्यक्त करणे योग्य नाही. पण एक गोष्ट आहे की खासदार संजय राऊत यांनी जी मुदत मागितली होती. ती मुदत देण्यात आली नाही. अनेक वर्ष याचा तपास सुरू आहे. संजय राऊत हे सामाजिक काम तसेच पत्रकारांच्या समस्येवर काम करत असून ते याही परिस्थितीवर योग्य प्रकारे ते आपली बाजू मांडतील. ज्यांनी मृत सहित्यकांची मुंडकी कापली आहे. आणि सांस्कृतिक अतिक्रमण केलं आहे. अशा प्रकारचे लोक जेव्हा बोलायला लागतात. तेव्हा त्यांना अशा पद्धतीने बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. एखाद्या झाडावर जसे बानगुडे असतात तसे या घटनेवर काही लोक बोलत आहे अशी टीका यावेळी गोऱ्हे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत बाबत अजूनही प्रतिक्रिया दिली नाही यावर गोऱ्हे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयीन तपास सुरू असताना अशा पद्धतीने प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मला एक वाटत आहे की ईडी, सीबीआय अशा संस्थाचा जर कालमर्यादेत निकाल लागला तर लोकांनाही कळेल अस देखील यावेळी गोऱ्हे म्हणाल्या आहेत.