नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 02:07 AM2018-11-17T02:07:01+5:302018-11-17T02:07:34+5:30
अपघाताला एक वर्ष पूर्ण : बोगद्यात उतरण्यासाठी लिफ्टची सोय; सुरक्षेची घेतली जातेय काळजी
अकोले : नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या अपघाताला एक वर्ष पूर्ण होत आहे. प्रकल्पाचे काम प्रगतिथावर आहे. अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या कामाच्या व्यवस्थेत बदल करून बोगदा खोदण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कामगारांना बोगद्यात उतरण्यासाठी लिप्टची सोय करण्यात आली आहे.
मागील वर्षी दि. २० नोव्हेंबरला अकोले येथील पाच नंबर शॉप्टच्या ठिकाणी काम करून वर येत असताना क्रेनचा वायररोप तुटून दोनशे फूट खाली आदळून आठ कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर तीन महिने काम बंद ठेवून जीविताला धोका असणाºया यंत्रणेत बदल करून काम जोमाने सुरू करण्यात आले आहे. बोगद्यात दोनशे फूट खोल खाली उतरण्यासाठी कामगारांना लिप्टची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कामाच्या ठिकाणी असणारी जुनी यंत्रसामग्री बदलून नवीन यंत्ररचना करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना दिली. नीरा नदी ते उजनी धरण असा हा नदीजोड प्रकल्प असून तावशी, भवानीनगर, काझड, अकोले, भादलवाडी, डाळजमार्गे उजनी धरण असा बोगद्यामार्गे नदीजोड प्रकल्प असून, मराठवाड्याला पाणी मिळावे यासाठी कृष्णा मराठवाडा पाटबंधारे विभाग उस्मानाबाद यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच शेतकºयांचा विरोध असून, आता कृष्णा नदीचे पाणी अगोदर नीरा नदीत आणा. त्यानंतर नीरा नदीचे ८ टीएमसी पाणी उजनी धरणात सोडा यासाठी आता शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, काझड, अकोले, भादलवाडी या गावांच्या हद्दीमध्ये जमिनीपासून १५० फूट खोल खाली रात्रंदिवस युद्धपातळीवर बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे.२
कुंभी-कासारी-कडवी-वारणा-कृष्णा-नीरा ते भीमा असा हा सुमारे दोनशे किलोमीटरचा नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव तयार आहे. कोल्हापूर-सांगली-सातारा-पुणे-उस्मानाबाद ते सोलापूर या जिल्ह्यांतून हा पाण्याचा प्रवास होऊन त्याचा साठा उजनी धरणात करण्याचा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र ठराविक दिवसांनी यासाठी विरोध सुरू असून पूर्णत्वाला नेण्यासाठी अडचणींचा काळ ठरणार आहे.