नीरा नदीवरील बंधारे निखळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 02:59 AM2018-05-08T02:59:37+5:302018-05-08T02:59:37+5:30

येथील नीरा नदीवर शेती व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून बांधलेले कोल्हापूर बंधारे दिवसेंदिवस निरुपयोगी झाले आहेत. हे बंधारे निखळले असून, भगदाडं पडली आहेत. पिलरही वाहून गेले असल्याने पाणी थांबतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना काही उपयोग होताना दिसत नाही.

 Neerah bunds stemmed | नीरा नदीवरील बंधारे निखळले

नीरा नदीवरील बंधारे निखळले

Next

भोर  - येथील नीरा नदीवर शेती व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून बांधलेले कोल्हापूर बंधारे दिवसेंदिवस निरुपयोगी झाले आहेत. हे बंधारे निखळले असून, भगदाडं पडली आहेत. पिलरही वाहून गेले असल्याने पाणी थांबतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना काही उपयोग होताना दिसत नाही.
दगडी बंधाºयांपैकी सर्वच बंधाºयांना साधारणपणे २० ते २५ वर्षे झाल्याने दगड, सिमेंट निघाले आहेत. आलेले पाणी वाहून गेल्याने शेतीच्या पाणी उपसा योजना, नळपाणी पुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे. काही दिवसांत नळपाणीपुरवठा योजनाही अडचणीत येतील. मात्र पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, दुरुस्तीची मागणी केली आहे.
नीरा नदीवर निगुडघर, आपटी, नांदगाव, आंबेघर, शिंद, वेनवडी, येवली, वडगावडाळ या ठिकाणी शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने कोल्हापूर पद्धतीचे दगडी बांधकाम असलेले बंधारे बांधण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाचे कामामुळे अनेक बंधाºयांचे सिमेंट, दगड निघाले असून, मोठमोठी भगदाडं पडली आहेत. मोºया वाहून गेल्या असून, अनेक ठिकाणचा स्लॅब पडला आहे. पिलर वाहून गेल्यामुळे बंधाºयावरून अलीकडे व पलीकडे जाता येत नाही. पायातून पाणी वाहून जात आहे.

अनेक वर्षांपासून पाणीसाठाच होत नाही
अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात बंधाºयाच्या पाण्यावर
अवलंबून असलेल्या साळव रायरी, कंकवाडी, निगुडघर, आपटी, नांदगाव, आंबेघर, वाठार,पोम्बर्डी, शिंद, वेनवडी
या गावच्या नळपाणीपुरवठा योजना धोक्यात येऊ शकतात.
त्यामुळे बंधाºयांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र
याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बंधारे दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठवले असल्याचे पाटबंधारे विभाग सांगत आहे. दोन वर्षांत काहीच मंजुरी मिळाली नाही.

असून अडचण नसून खोळंबा...

आठ ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र गळती लागल्याने अनेक बंधाºयांत पाणीसाठा होत नसल्याने ते कोरडे पडतात. त्यामुळे शेतीला व पिण्याच्या पाण्याला काहीच उपयोेग होत नसल्याने बंधाºयाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे, त्यामुळे सदर बंधाºयांची दुरुस्ती करण्याची मागणी येवलीचे माजी सरपंच सुनील धुमाळ यांनी केली आहे.

शिंद, वेनवडी, येवली व वडगाव येथील बंधाºयांच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक शासनाकडे मंजुरीसाठी सादर केले आहे.
त्याला मंजुरी मिळाल्यावर दुरुस्ती करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title:  Neerah bunds stemmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.