आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमधील ‘अॅथलेटिक्स स्टेडियम’ला नीरज चोप्रा याचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:16 AM2021-08-21T04:16:21+5:302021-08-21T04:16:21+5:30

पुणे : लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या घोरपडी येथील ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’मधील ‘अॅथलेटिक्स स्टेडियम’ला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेणारा भालाफेकपटू ...

Neeraj Chopra names 'Athletics Stadium' at Army Sports Institute | आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमधील ‘अॅथलेटिक्स स्टेडियम’ला नीरज चोप्रा याचे नाव

आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमधील ‘अॅथलेटिक्स स्टेडियम’ला नीरज चोप्रा याचे नाव

Next

पुणे : लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या घोरपडी येथील ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’मधील ‘अॅथलेटिक्स स्टेडियम’ला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे नाव देण्यात येणार आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि.२३) हे नामकरण केले जाणार आहे. या वेळी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे आणि दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या लष्कराच्या सोळा खेळाडूंचा गौरव संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते केला जाणार आहे.

‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’मध्ये हे स्टेडियम २००६ साली उभारण्यात आले. या स्टेडियममध्ये ४00 मीटरचा सिंथेटिक ट्रॅक असून, प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचा सुभेदार असलेल्या नीरज चोप्राने या संस्थेत भालाफेकीचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले होते. त्याच्या ऐतिहासिक कामगिरीच्या गौरवार्थ या संस्थेतील ‘अॅथलेटिक्स स्टेडियम’ आता ‘नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स स्टेडियम, पुणे कँटोन्मेंट’ म्हणून ओळखले जाणार असून, तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुण ‘अॅथलिट्स’ना प्रेरणा मिळणार आहे.

तत्पूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सोमवारी सकाळी खडकवासला येथील ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी’ संस्थेला भेट देणार आहेत, असे लष्करातर्फे सांगण्यात आले.

Web Title: Neeraj Chopra names 'Athletics Stadium' at Army Sports Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.