बलात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनातील नकारात्मक भावना होणार दूर; सशक्त आणि विश्वासाने जगता येण्यासाठी पुण्यात ’रेप क्रायसिस' सेंटर’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 08:05 PM2021-08-31T20:05:35+5:302021-08-31T20:06:36+5:30

बलात्कारासह जगणा-यांना त्यांचे दु:ख व समस्या सांगण्यासाठी एक सुरक्षित जागा म्हणून ’सपोर्ट ग्रुप’ चालविण्यात येणार आहे,

The negative building in the minds of raped women will be far away; 'Rape Crisis Center' in Pune to live strong and confident | बलात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनातील नकारात्मक भावना होणार दूर; सशक्त आणि विश्वासाने जगता येण्यासाठी पुण्यात ’रेप क्रायसिस' सेंटर’

बलात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनातील नकारात्मक भावना होणार दूर; सशक्त आणि विश्वासाने जगता येण्यासाठी पुण्यात ’रेप क्रायसिस' सेंटर’

Next
ठळक मुद्देप्रशिक्षित व्यक्तीद्वारे बलात्कारग्रस्त स्त्रियांचे समुपदेशन करून मानसिकदृष्ट्या मजबूत करणार

 पुणे : प्रत्येकाला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क आहे. बलात्कारातून सावरणा-या स्त्रियांना कायदेविषयक मदत देण्यातून अशा माणुसकीविरोधी गुन्हयांना केवळ प्रतिबंधच होणार नाही तर अत्याचारग्रस्त स्त्रियांना सशक्तपणे व विश्वासाने जगण्यासाठी सहकार्य करण्याच्या उददेशाने सहयोग ट्रस्टतर्फे ‘रेप क्रायसिस सेंटर’ सुरु करण्यात आले आहे. बलात्कारासह जगणा-यांना त्यांचे दु:ख व समस्या सांगण्यासाठी एक सुरक्षित
जागा म्हणून ’सपोर्ट ग्रुप’ चालविण्यात येणार आहे. 

सहयोग ट्रस्टच्या सचिव अँड. रमा सरोदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सुरेखा दास , रेश्मा गोखले, गौरांगी ताजणे, अँड.अजित देशपांडे, अँड.अक्षय देसाई, शार्दुल सहारे, तृणाल टोणपे यावेळी उपस्थित होते.

सरोदे म्हणाल्या, ज्या महिलांवर लैगिंक अत्याचार झालेले असतात. त्यांनी जणू काही स्वत:च चूक केली आहे असा दबाव घेऊन त्या जगत असतात. त्यामुळे त्यांच्या मनातील ताणतणाव एकमेकांसोबत संवाद साधण्यातून कमी करण्याचा प्रयत्न हा सपोर्ट ग्रृप करणार आहे. मायग्रोथ झोन ही कंपनी न्युरोलिंगविस्टिक तंत्रावर काम करते. त्यांच्यातर्फे प्रशिक्षित व्यक्तीद्वारे बलात्कारग्रस्त स्त्रियांचे समुपदेशन करून त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी मोफत मदत करण्यात येणार आहे. मायग्रोथ झोनसोबत सहयोग ट्रस्ट सहका-याच्या भावनेतून बलात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनात निर्माण होणारी नकारात्मक भावना, आपल्या हातून पाप घडले व आपलीच चूक आहे, अशी स्वत:लाच दोष देणारी भावना, मनातील भीती, राग या संदर्भात वागणुकीत बदल घडवून आणण्यासाठी काम करणार आहे. 

''एकीकडे बलात्काराचे प्रमाण कमी होत असताना दुसरीकडे शिक्षा होण्याचे प्रमाणही नगण्य असल्याने बलात्काराशी लढणा-या स्त्रियांना नैराश्य येते. दरम्यान, बलात्कारग्रस्त स्त्रिया, त्यांची मुले व परिवार यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्याचे काम तुणाल टोणपे करणार आहेत.असं सुरेखा दास यांनी सांगितलं.'' 

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार

- २०१९ साली देशात बलात्काराच्या ३२, ५५९ घटना
-  दररोज ८८ बलात्कार होतात
-  राज्यात २०१९ साली बलात्काराचे २,२९९ गुन्हे

Web Title: The negative building in the minds of raped women will be far away; 'Rape Crisis Center' in Pune to live strong and confident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.