हडपसरमध्ये नाल्यांच्या कामांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:11+5:302021-05-16T04:11:11+5:30

शिवसेना उपविभागप्रमुख बनकर यांनी शिवसेनेच्या वतीने हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त यांना पावसाळापूर्व कामे तातडीने करावीत, असे निवेदन ...

Neglect of nala works in Hadapsar | हडपसरमध्ये नाल्यांच्या कामांकडे दुर्लक्ष

हडपसरमध्ये नाल्यांच्या कामांकडे दुर्लक्ष

Next

शिवसेना उपविभागप्रमुख बनकर यांनी शिवसेनेच्या वतीने हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त यांना पावसाळापूर्व कामे तातडीने करावीत, असे निवेदन दिले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख, उपशहरप्रमुख समीर तुपे, हडपसर विभागप्रमुख प्रशांत पोमण उपस्थित होते.

बनकर म्हणाले की, ससाणेनगर, हडपसर गाव, काळे बोराटेनगर परिसरातील सांडपाण्याच्या वाहिन्या, हडपसर भाजी मंडईतील पावसाळी गटारे, ससाणेनगर रेल्वे गेट ते नवीन कालव्यालगतच्या पांढरे मळा या मुख्य रस्त्यावरील सांडपाण्याच्या आणि पावसाळी वाहिन्या, हडपसर गावठाणातील ससाणेआळी, मगरआळी, रामोशी आळी, फुलारेआळी, शिंपीआळी, डांगमाळीआळी, आल्हाटवस्ती, पुणे-सोलापूर महामार्गावरील मगरपट्टा चौक, रवीदर्शन चौक येथील मलवाहिन्या आणि पावसाळी वाहिन्यांसह ओढ्या-नाले स्वच्छ केले नाहीत. त्यामुळे पहिल्याच पावसात पाण्याचा लोंढ्याबरोबर झाडपाला, कचरा, माती वाहून येते.

मात्र, नाल्याची स्वच्छता न केल्यामुळे नाले तुंबून सखल भागातील नागरी वस्तीसह रस्त्यावर पाणी साचण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने कागदी घोडे नाचवून काम केल्याचे सांगण्याऐवजी घटनास्थळी नागरिकांसमवेत पाहणी करून खात्री करावी. पावसाचे पाणी साचून नागरीवस्तीमध्ये शिरले आणि पुणे-सोलापूर रस्त्यासह हडपसरमधील अंतर्गत रस्त्यावर पाणी साचून वाहतूककोंडी झाली, तर त्याला पालिका प्रशासनाला अधिकारी-कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे त्यांनी सांगितले.

वाहिन्यांसह ओढे-नाले तातडीने स्वच्छ करणे अपेक्षित आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप पावसाळापूर्व कामे झाली नाहीत. प्रशासनाने आता तरी झोपडपट्टी, बैठ्या चाळींसह सोसायट्यांमधील चेंबर, पावसाळी वाहिन्यांची कामे करण्यासाठी तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हडपसर परिसरातील मलवाहिनी, सांडपाणी आणि पावसाळी वाहिन्या स्वच्छ करण्याचे काम सुरू असून, ओढ्या-नाल्यांची स्वच्छता केली जात आहे. नागरिकांनी पावसाळापूर्व कामे सांगितली तरी ती केली जातात. पावसाचे पाणी साचणार नाही किंवा नागरिकांच्या घरामध्ये शिरणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

- प्रकाश पवार

उपअभियंता, महापालिका

Web Title: Neglect of nala works in Hadapsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.