विद्येच्या माहेरघरातच शिक्षणाची उपेक्षा; शिक्षकांच्या २०० जागा रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 01:38 PM2023-01-24T13:38:40+5:302023-01-24T13:40:27+5:30

पुणे पालिका देते फक्त दर महा १५ हजार मानधन तर पिपंरी चिचंवड पालिका देते २५ हजार मानधन

Neglect of education in the home of education Shocking revelation of 200 vacant posts of teachers | विद्येच्या माहेरघरातच शिक्षणाची उपेक्षा; शिक्षकांच्या २०० जागा रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

विद्येच्या माहेरघरातच शिक्षणाची उपेक्षा; शिक्षकांच्या २०० जागा रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

googlenewsNext

राजू हिंगे 

पुणे: पुणे महापालिकेच्या २६० शाळा पैकी ११० शाळांना मुख्याध्यापक नाही. त्यातच पालिका हंगामी शिक्षकांना केवळ १५ हजार रूपये मासिक वेतन देत आहे. याउलट पिपंरी चिचंवड महापालिका हंगामी शिक्षकांना २५ हजार रूपये वेतन देत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतील शाळामध्ये फक्त १६० हंगामी शिक्षकच नोकरीवर आहेत. शिक्षकांचा २०० जागा रिक्त आहे. त्यामुळे विघेच्या माहेरघरात शिक्षणाची आणि शिक्षकांची उपेक्षा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कोरोनानंतर पुणे महापालिकेच्य शाळाच्या विधाथ्याची संख्या वाढली. त्याने विधार्थी जास्त आणि शिक्षक कमी अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे पुणे महापालिकेने शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर लक्षात घेता ३५० हंगामी शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शिक्षक भरती करण्यात आली. त्यानुसार २८९ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. पण, या शिक्षकांना एकवट १५ हजार रुपये दरमहा मानधन दिले जाते.सातत्याने वाढत्या महागाईच्या काळात १५ हजार रूपयामध्ये पुण्यासारख्या शहरात राहण्यासाठी हे वेतन अपुरे आहे. त्यामुळे काही शिक्षकांची ही नोकरी नाकारली आहे. त्याने पुणे महापालिकेत अवघे १२० शिक्षकच नोकरीवर रुजू झाले आहेत. त्यामुळे पालिकेच्या शाळामध्ये हंगामी शिक्षकाची एकुण संख्या १६० आहे.

११० शाळांना मुख्याध्यापकच नाही

पुणे महापालिकेच्या एकुण २६० शाळा आहे. त्यापैकी काही शाळा एकाच इमारतीमध्ये आहे. मात्र त्यापैकी ११० शाळांना मुख्याध्यापक नाही. त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. संबधित शाळांतील जेष्ठ शिक्षकांकडे प्रभारी मुख्याध्यापकांचा पदभार सोपविण्यात आला आहे. या शिक्षकांना विघाथ्याना शिक्षणाबरोबर आणि शाळेचे व्यवस्थापन करावे लागते.

शिक्षकांच्या २०० जागा रिक्त

पुणे महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांच्या २०० जागा रिक्त आहे. त्याने पुणे महापालिकेच्या काही शाळेतील अनेक वर्ग शिक्षकांविनाच आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.

सर्वोच्च न्यायालयात न्यायालयात याचिका

पुणे महापालिकेत १ नोव्हेंबर १९९९ रोजी काही गावे समाविष्ट झाली. त्यावेळी शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेचा मुददा उपस्थित झाला. त्यामुळे या बाबात शिक्षक संघटनेने न्यायालयात याचिका दाखल केली . सर्वोच्च न्यायालयात न्यायालयात ही याचिका आहे अशी माहिती महाराष्ट राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षण व केंदप्रमुख सभेचे पुणे शहराध्यक्ष विकास काटे यांनी सांगितले.

पूर्वी या शिक्षकांना १२ हजार रूपये मानधन दिले जात होते

मुख्याध्यापकांच्या ११० जागा रिक्त आहे. या जागावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव सातत्याने ठेवला आहे. पण सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे यावर निर्णय घेतला जात नाही. पुणे महापालिकेने हंगामी तत्वावरील शिक्षकांच्या मानधनात यंदा वाढ केली आहे. पुवी या शिक्षकांना १२ हजार रूपये मानधन दिले जात होते. पण आता या शिक्षकांना १५ हजार रूपये मानधन दिले जात आहे. - मिनाक्षी राउत , प्रशासकीय अधिकारी , प्राथमिक शिक्षण विभाग, पुणे महापालिका

Web Title: Neglect of education in the home of education Shocking revelation of 200 vacant posts of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.