कामगार आयुक्तच्या पडक्या इमारतीची सरकारकडून उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:12 AM2021-07-14T04:12:58+5:302021-07-14T04:12:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: वाकडेवाडी येथील बैठ्या कौलारू इमारतीमधील कामगार आयुक्त कार्यालय पडायला झाले आहे. या इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: वाकडेवाडी येथील बैठ्या कौलारू इमारतीमधील कामगार आयुक्त कार्यालय पडायला झाले आहे. या इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव गेली ५ वर्षे सरकारकडे पडून आहे.
अधिकारी, कर्मचारी या कार्यालयात बसून व कामानिमित्त येणारे नागरिकही रंग उडालेल्या भिंती पाहून त्रस्त झाले आहेत. साडेसात हजार चौरस फुटांची ही जागा कामगार मंत्रालयाचीच आहे. बऱ्र्याच वर्षांपूर्वी ती खासगी मालकाकडून विकत घेण्यात आली. राहता बंगला असलेल्या इमारतीचे सरकारी कार्यालय झाले आहे. विकत घेतले तेव्हाच ते जुने झाले होते.
आसपास साखर आयुक्त कार्यालय, कृषी संशोधन परिषद अशी अत्याधुनिक सरकारी इमारती उभ्या राहात असताना कळकट झालेल्या कामगार आयुक्त कार्यालयाकडे पहायला मात्र सरकारकडे वेळ नाही. पुण्यासह सोलापूर, सातारा, सांगली ,कोल्हापूर अशा ५ जिल्ह्यांचा कार्यभार आहे. १ अतिरिक्त आयुक्त,२ सहायक आयुक्त, अन्य अनेक अधिकारी व कर्मचारी इथे बसतात. रोज शेकडो मालक, कामगारांची ये-जा असते. कळा गेलेल्या या इमारतीला सगळेच वैतागले आहेत.
कामगार मंत्रालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले. त्यांनी ५ मजली इमारतीचा ४५ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला व कामगार खात्याला दिला. त्यांंनी तो सरकारकडे म्हणजे अर्थ विभागाला दिला आहे. त्याला आता ४ वर्षे झाली. एकही कागद अद्याप हललेला नाही.
---///
आता आम्ही एक समिती नियुक्त केली आहे. काही त्रुटी आहेत. काही प्रश्न आहेत. त्याचे निराकारण झाले की प्रस्ताव पुढे जाईल.-
शैलेंद्र पोळ- अतिरिक्त कामगार आयुक्त, पुणे विभाग