निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:09 AM2021-05-29T04:09:31+5:302021-05-29T04:09:31+5:30
याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सोनवडी येथील वार्ड क्रमांक २ अ चे मतदान केंद्राध्यक्ष ...
याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सोनवडी येथील वार्ड क्रमांक २ अ चे मतदान केंद्राध्यक्ष नानासाहेब शिंदे हे मतदान अधिकारी एक यांच्या जागेवर बसून होते. एका महिलेचे मतदान त्यांनी स्वतः जाऊन केले असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी समक्ष जाऊन पाहणी करून जबाब घेतले, तसेच झोनल अधिकारी निर्मला राशिनकर यांनीही या घटनेचा अहवाल तहसीलदार संजय पाटील यांना सादर केला होता. तर सोनवडी ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी सासवडे यांनी ही तहसीलदारांना दिलेल्या पत्रात नानासाहेब शिंदे यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचे लिहिले आहे.
त्यानंतर तहसीलदार संजय पाटील यांनी नानासाहेब शिंदे यांना खुलासा मागविला होता. त्यानुसार शिंदे यांनी त्यांचा खुलासा तहसीलदारांना सादर केला. त्यांचा खुलासा तहसीलदारांनी अमान्य करत त्यांनी निवडणूक कामात व शासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम-१९५८ अन्वये व प्रतिनिधी अधिनियम १९५१ नुसार कारवाई करण्यासाठी दौंड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे यांना प्राधिकृत केले होते. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी नवनाथ वनवे यांनी दौंड पोलीस ठाण्यात नानासाहेब शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लोंढे करीत आहेत.