नुकसान भरपाई अहवालाबाबत हलगर्जी, तहसीलदांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:10 AM2021-05-30T04:10:24+5:302021-05-30T04:10:24+5:30

२०१८ मधील दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता शासनाने निधीची मान्यता दिली होती. जिल्हाधिकारी यांनी शासन निर्णयानुसार नुकसान भरपाईसाठी ...

Negligence regarding compensation report, notice to tehsildar | नुकसान भरपाई अहवालाबाबत हलगर्जी, तहसीलदांना नोटीस

नुकसान भरपाई अहवालाबाबत हलगर्जी, तहसीलदांना नोटीस

Next

२०१८ मधील दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता शासनाने निधीची मान्यता दिली होती. जिल्हाधिकारी यांनी शासन निर्णयानुसार नुकसान भरपाईसाठी निधी मागणी कळविण्याचे आदेश तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दिले होते. जुन्नर तालुक्यात सहा महसूल मंडळात दुष्काळ जाहीर होऊन देखील प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकरी वंचित राहिल्याने तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बांगरवाडीचे सरपंच जालिंदर बांगर व इतरांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केली होती. संबंधीत तक्रार अर्जासंदर्भात चौकशी अहवाल पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रांताधिकारी कार्यालयास देण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रांताधिकारी सारंग कोडीलकर यांनी तहसीलदार हनुमंत कोळेकर यांना दि.२ जून समक्ष उपस्थित राहून लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Negligence regarding compensation report, notice to tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.