गैरप्रकारांचे महापरीक्षा पोर्टल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 07:02 AM2018-05-21T07:02:12+5:302018-05-21T07:02:12+5:30

महापरीक्षा मंडळ बरखास्त करून नोकरभरतीची जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Negro Examination Portal | गैरप्रकारांचे महापरीक्षा पोर्टल

गैरप्रकारांचे महापरीक्षा पोर्टल

Next

पुणे : राज्य शासनाने सर्व गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील पदांच्या भरतीची प्रक्रिया राबविणाऱ्या महापरीक्षा पोर्टलच्या गैरकारभारामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. भरती परीक्षेदरम्यान होणारा ढिसाळपणा, मास कॉपीचे प्रकार, डमी विद्यार्थी परीक्षेला बसणे आदी असंख्य गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे महापरीक्षा मंडळ बरखास्त करून नोकरभरतीची जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
माहिती तंत्रशिक्षण विभागाकडून सुरू करण्यात ‘महापरीक्षा’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील पदे भरणे १ आॅक्टोबर २०१७ पासून बंधनकारक करण्यात आले आहे. महापरीक्षा पोर्टलकडून घेतल्या जाणाºया आॅनलाइन व आॅफलाइन परीक्षांच्या गैरकारभारामुळे विद्यार्थ्यांचा त्यावरील विश्वास उडाला आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी विविध मागण्यासांठी पुणे ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे. त्यामध्ये महापरीक्षा हे पोर्टल तातडीने बंद करण्यत यावे, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
महापरीक्षा पोर्टलच्या वतीने घेण्यात येणाºया परीक्षांची काही केंद्रे ्रखासगी कॉम्प्युटर सेंटरलाही देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक दिला असला तरी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात कुठेही बसून लॉगइन करण्याची परवानगी दिली जाते. त्यामध्ये विद्यार्थी शेजारी शेजारी बसून एकमेकांचे पाहून परीक्षा देत आहेत. त्यातून मास कॉपीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. अनेक केंद्रांवर विद्यार्थ्यांची तपासणीच करण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थी मोबाइल, इलेक्ट्रॉनिक गॅझेट सोबत घेऊन परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रांवर अनेकदा नेटवर्कच्या समस्येमुळे परीक्षेचे वेळापत्रक कोलमडते. कॉम्प्युटर अचानक बंद होतात, परीक्षेचा वेळ संपण्यापूर्वीच कॉम्प्युटर बंद होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नाहक नुकसान होत आहे. महाविद्यालयांमध्ये बीए, बीकॉमच्या पहिल्या, दुसºया वर्षाला शिकत असलेले विद्यार्थी या परीक्षांसाठी पर्यवेक्षक म्हणून येतात, त्यामुळे अनेकदा या पर्यवेक्षकांना परीक्षार्थी जुमानत नसल्याचे दिसून येते.
महाराष्टÑ नगर परिषद सेवा, नगररचना विभाग, बांधकाम विभाग, न्यायवैद्यक प्रयोगशाळा आदी ठिकाणच्या विविध पदांसाठी महापरीक्षा पोर्टलकडून परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षांसाठी अत्यंत सोपे प्रश्न विचारण्यात येत आहेत. परीक्षेची काठिण्यपातळीच कमी ठेवल्याने परीक्षेचा दर्जा घसरत चालला आहे. सध्या नोकरी मिळविण्यासाठी तीव्र स्पर्धांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्याचवेळी शासनाच्या नोकरभरतीमध्ये ढिसाळपणामुळे होऊ लागल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आक्षेप
१. खासगी कॉम्प्युटर सेंटरमध्ये परीक्षा केंद्र
२. बीए, बीकॉमला शिकणारे विद्यार्थी असतात पर्यवेक्षक
३. डमी उमेदवार परीक्षेला बसल्याचे प्रकार उजेडात
४. परीक्षार्थी शेजारी-शेजारी बसून करतात मास कॉपी
५. तपासणीच होत नसल्याने मोबाइल, इलेक्ट्रॉनिक गॅझेट सोबत नेले जातात
६. नेटवर्क समस्येमुळे कॉम्प्युटर अचानक बंद पडतात
७. वेळापत्रकानुसार होत नाही परीक्षा

महापरीक्षा पोर्टलकडून नोकरभरती व इतर शैक्षणिक कारणांसाठी घेण्यात आलेल्या बहुतांश परीक्षा गैरप्रकारांमुळे वादग्रस्त ठरल्या आहेत. महापोर्टलने कृषीसेवक पदाच्या ९०३ जागांसाठी घेतलेल्या परीक्षेत अनेक गैरप्रकार झाल्याचे उजेडात आले. त्यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या अभियोग्यता परीक्षेतील काही उमेदवारांचे गुण निकालानंतर वाढविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून घेतली जाणारी परीक्षा अत्यंत सदोष आहे. त्यामुळे महापरीक्षा म्हणजेच गैरप्रकार अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
- गणेश दराडे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा विद्यार्थी

Web Title: Negro Examination Portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा