नेहरूंमुळेच देश लोकशाहीप्रधान
By admin | Published: November 15, 2014 12:08 AM2014-11-15T00:08:03+5:302014-11-15T00:08:03+5:30
पं. जवाहरलाल नेहरू यांनी देशात लोकशाहीचे मानदंड प्रस्थापित केले. खरेतर ते हुकूमशहा झाले असते. लोकांची तशी इच्छाही होती; पण ते झाले नाहीत.
Next
पुणो : पं. जवाहरलाल नेहरू यांनी देशात लोकशाहीचे मानदंड प्रस्थापित केले. खरेतर ते हुकूमशहा झाले असते. लोकांची तशी इच्छाही होती; पण ते झाले नाहीत. नेहरू नसते तर हा देश लोकशाहीप्रधान म्हणून अस्तित्वातच आला नसता, असे मत ज्येष्ठ लेखक आणि वैज्ञानिक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी व्यक्त केले.
लोकबोधिनीच्या वतीने नवी पेठ येथील पत्रकार भवनमध्ये ‘स्वतंत्र भारताच्या उभारणीत पं नेहरूंचे योगदान’ या विषयावर डॉ. दाभोलकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकबोधिनीचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन उपस्थित होते.
पं. नेहरूंविषयी आज समाजात चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत, हा एकप्रकारे त्यांच्यावर केला जाणारा अन्यायच आहे. देशासाठी योगदान दिलेल्या अशा महापुरुषांवर कोणतेही भाष्य करण्यापूर्वी त्यांना समजावून घेणो आवश्यक आहे, असे सांगून पं. नेहरूंचा राजकीय पट त्यांनी उलगडला.
पं. नेहरू यांच्याऐवजी सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पंतप्रधान असते, तर देशाचे चित्र काहीसे वेगळे झाले असते, अशी भाषा काही मंडळींकडून आज केली जात आहे. पण, पटेल आणि नेहरू यांची विचारसरणी ही एकच होती. विविध विषयांवर त्यांच्यामध्ये पत्रव्यवहार होत असत, याचे पुरावेही उपलब्ध आहेत, असे दाभोलकर म्हणाले.
(प्रतिनिधी)
हे पटेल यांचे भाग्यच.!
4त्या काळातही नेहरू हे ‘हिटलिस्टवर’ होते, त्यात नवीन काहीच नाही. आज नेहरूंच्या बरोबरीने पटेल यांचे नाव घेतले जात आहे. मात्र, पटेल यांचे नाव घेणा:या संघ आणि हिंदू संघटनांविषयी स्वत: पटेल यांनीच भीती व्यक्त केली होती, अशा संघटना समाजात विष पसरविण्याचे काम करीत आहेत, असे त्यांनी म्हटले होते. असे असूनही पटेल त्यांना आपले वाटत असतील तर हे पटेल यांचे भाग्यच म्हणावे लागेल, असे दाभोलकर म्हणाले.