पुण्यातील खळबळजनक घटना! चिकन न आणल्याने शेजाऱ्यांकडून एकाचा डोक्यात दगड घालून खून

By नम्रता फडणीस | Published: August 12, 2022 05:21 PM2022-08-12T17:21:43+5:302022-08-12T17:21:56+5:30

लोणीकंद पोलिसांकडून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल

Neighbors killed one by throwing a stone on his head for not bringing chicken in pune | पुण्यातील खळबळजनक घटना! चिकन न आणल्याने शेजाऱ्यांकडून एकाचा डोक्यात दगड घालून खून

पुण्यातील खळबळजनक घटना! चिकन न आणल्याने शेजाऱ्यांकडून एकाचा डोक्यात दगड घालून खून

Next

पुणे : चिकन न आणल्याने शेजाऱ्यांनी डोक्यात दगड घालून एकाचा खून केला. ही घटना वाघोली परिसरात घडली. या प्रकरणी तिघांच्या विरोधात लाेणीकंद पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर नायक (वय ३५, सध्या रा. रानवारा हाॅटेलसमोर, वाडेबोल्हाई-केसनंद रस्ता, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी शेजारी विकास भोसले, कविता भोसले, बल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नायक यांची पत्नी मेहबू यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नायक आणि आरोपी भोसले दाम्पत्य शेजारी आहेत. नायक यांना आरोपींनी चिकन आणण्यास सांगितले होते. चिकन न आणल्याने आरोपी नायक यांच्यावर चिडले. नायक यांची पत्नी मेहबू आणि मुलीला आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केली. भांडणात शंकर नायक यांनी मध्यस्थी केली. त्या वेळी आरोपी विकास भोसले आणि साथीदारांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार तपास करत आहेत.

Web Title: Neighbors killed one by throwing a stone on his head for not bringing chicken in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.