टेबल टेनिसमध्ये नील, पृथा अजिंक्य

By admin | Published: July 8, 2017 02:38 AM2017-07-08T02:38:58+5:302017-07-08T02:38:58+5:30

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबतर्फे आयोजित जिल्हा मानांकन टेबल अ‍ेनिस स्पर्धेत नील मुळ्ये आणि पृथा वर्टीकर यांनी १२ वर्षांखालील

Neil in the table tennis, the world number one | टेबल टेनिसमध्ये नील, पृथा अजिंक्य

टेबल टेनिसमध्ये नील, पृथा अजिंक्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबतर्फे आयोजित जिल्हा मानांकन टेबल अ‍ेनिस स्पर्धेत नील मुळ्ये आणि पृथा वर्टीकर यांनी १२ वर्षांखालील वयोगटात अनुक्रमे मुलांच्या तसेच मुलींच्या गटातील विजेतेपदाला शुक्रवारी गवसणी घातली.
ही स्पर्धा पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने पीवायसी हिंदू जिमखान्याच्या टेबल टेनिस हॉलमध्ये सुरू आहे. १२ वर्षांखालील मुलांच्या गटात झालेल्या अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित नीलने अव्वल मानांकित दक्ष जाधवला ३-०ने सहजपणे चकित करीत बाजी मारली. ही लढत नीलने १२-१०, ११-९, ११-९ अशी जिंकली.
या वर्षी जबरदस्त फॉर्मात असलेल्या पृथाने मुलींच्या गटाचे विजेतेपद आपल्या नावे करताना राधिका सकपाळवर ११-६, ११-८, ११-६ने मात केली. नांदेड येथे नुकत्याच झालेल्या राज्य मानांकन स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले होते. त्याआधी इंदूर येथे झालेल्या पूर्व विभागीय राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकले होते.
१५ वर्षांखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित मृण्मयी रायखेलकर हिने इशा जोशीचे आव्हान ११-६, ११-३, ११-३ने संपवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. राधिका सकपाळने रीमा देसलेचा १३-११, ११-६, ११-७ने पराभव केला.
तिसऱ्या मानांकित अनीहा डिसुझाने प्रीशा बुधीराजा हिच्यावर ११-२, ११-७, ११-७ने सरशी साधली. १२वी मानांकित सिद्धी आचरेकर ५ गेमच्या कडव्या झुंजीनंतर मयुरी ठोंबरेकडून २-३ने पराभूत झाली. पचव्या मानांकित मयुरीने ही लढत ११-७, ७-११, १३-११, ६-११, ११-६ ने जिंकली. दुसरी मानांकित
पृथा वर्टीकर, स्वप्नाली नारळे, प्रीती गाझवे यांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवून अंतिम ८ खेळाडूंत प्रवेश केला.

निकाल
१२ वर्षांखालील मुले : उपांत्य फेरी : दक्ष जाधव विवि सम्यक मोटलिंग ११-९, ११-१, ११-६. नील मुळ्ये विवि वेदांग जोशी ११-९, १२-१०, ८-११, ११-३; अंतिम फेरी : नील मुळ्ये विवि दक्ष जाधव १२-१०, ११-९, ११-९;
१२ वर्षांखालील मुली : उपांत्य फेरी : पृथा वर्टीकर विवि पृथा आचरेकर ११-६, ११-०, ११-९. राधिका सकपाळ विवि देवयानी कुलकर्णी ११-६, १२-१०, ११-७; अंतिम फेरी : पृथा वर्टीकर विवि राधिका सकपाळ ११-६, ११-८, ११-६; १५ वर्षांखालील मुली : उपउपांत्यपूर्व फेरी : मृण्मयी रायखेलकर विवि इशा जोशी ११-६, ११-३, ११-५. राधिका सकपाळ विवि रीमा देसले १३-११, ११-६, ११-७. मयुरी ठोंबरे विवि सिद्धी आचरेकर ११-७, ७-११, १३-११, ६-११, ११-६. पूजा जोरावर विवि देवयानी कुलकर्णी २-११, ११-५, ११-५, ११-२. अनीहा डिसुझा विवि प्रिशा बुधिराजा ११-२, ११-२, ११-७. प्रीती गाढवे विवि धनश्री पवार ११-३, ११-५, १५-१३. स्वप्नाली नारळे विवि प्रीती साळुंखे ११-७, ११-८, ११-५. पृथा वर्टीकर विवि पृथा आचरेकर ११-४, ११-२, ११-३; १५ वर्षांखालील मुले : तिसरी फेरी : करण कुकरेजा विवि अथर्व चांदोरकर ११-६, ११-४, ११-३. अक्षय पाटणकर विवि अर्णव भालवणकर ११-६, ११-१३, ११-४, ११-५. सनत जैन विवि अनिरूद्ध श्रीराम ११-४, ११-३, ११-१. नवनीत श्रीराम विवि प्रियान शिरस ११-५, ११-५, ११-७. साई बगाटे विवि अक्षय बोथरा ११-३, ११-५, ११-५. नील मुळ्ये विवि हार्दीक क्षीरसागर ११-५, ११-५, ११-५. तेजस मंकेश्वर विवि सम्यक मोटलिंग ११-७, ५-११, ११-८, ११-९. अर्चन आपटे विवि आर्यन इंगळे ११-४, ११-६, ११-९. वेदांग जोशी विवि असीम केळकर ११-६, ११-५, ११-९. मिहिर ठोंबरे विवि अथर्व खरे ११-४, ११-७, ११-३. भार्गव चक्रदेव विवि पार्थ चाफेकर ११-५, ११-३, ११-८. आदित्य जोरी विवि प्रणव कुलकर्णी ११-५, ११-४, ७-११, ११-०. आरूष गलपल्ली विवि कौशल कुलकर्णी ११-८, ११-८, ११-४.

Web Title: Neil in the table tennis, the world number one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.