'एव्हरेस्ट' सर केल्याचा खोटा दावा करणा-या पुण्यातील दांपत्यावर नेपाळमध्ये १० वर्षांची बंदी

By admin | Published: August 29, 2016 08:12 AM2016-08-29T08:12:19+5:302016-08-29T08:22:45+5:30

जगातील सर्वोच्च 'माऊंट एव्हरेस्ट शिखर' सर केल्याचा दावा करणा-या पुण्यातील दिनेश व तारकेश्वरी राठोड या दांपत्यावर नेपाळमध्ये १० वर्षांदी बंदी घालण्यात आली आहे

Nepal's 10-year ban on missing couple in Pune, Eve | 'एव्हरेस्ट' सर केल्याचा खोटा दावा करणा-या पुण्यातील दांपत्यावर नेपाळमध्ये १० वर्षांची बंदी

'एव्हरेस्ट' सर केल्याचा खोटा दावा करणा-या पुण्यातील दांपत्यावर नेपाळमध्ये १० वर्षांची बंदी

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २९ - जगातील सर्वोच्च 'माऊंट एव्हरेस्ट शिखर' सर केल्याचा दावा करणा-या पुण्यातील दिनेश व तारकेश्वरी राठोड या दांपत्यावर नेपाळमध्ये १० वर्षांदी बंदी घालण्यात आली आहे. राठोड दांपत्याने एव्हरेस्ट शिखर केल्याचा खोटा दावा केला असून खोटी माहिती दिल्याचे सांगत नेपाळ सरकारने त्यांच्यावर १० वर्षआंची बंदी घातली आहे. 
शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात दिनेश टी. राठोड (३०) व तारकेश्वरी भालेराव -राठोड (३०) हे कार्यरत आहेत. २००६ साली ते शहर पोलिस दलात रूजु झाले. तारकेश्वरी या राष्ट्रीय फुटबॉलपटू असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटेपटू देखील आहे. तर दिनेश हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटे व किकबॉक्सिंगपटू आहेत. या दोघांचा २००८ साली प्रेमविवाह झाला. आपल्या एव्हरेस्टच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. दुस-या प्रयत्नात जुन महिन्यात आपण हे शिखर सर केल्याचा दावा त्यांनी केला, तसेच एव्हरेस्टवरील काही फोटोही शेअर केले. 
मात्र त्यांचा हा दावा खोटा असून त्यांनी एव्हरेस्टवर कोणतीही चढाई केलेली नाही. तसेच पुण्यातील एका फोटोग्राफरकडून त्यांनी मॉर्फ केलेले (नकली) फोटो सादर केल्याचे उघड झाले आहे. एव्हरेस्ट शिखर सर केल्याबद्दल सादर करण्यात आलेली कागदपत्रेही खरी नसून ती बनावट असल्याचे समोर आले असून नेपाळ सरकारने त्यांचे पितळ उघडे पाडत त्यांच्यावर बंदी घातली आहे. 
 
दरम्यान हा प्रकार पोलिस दल व देशाची इमेज बिघडवणारा असल्याचे पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्लांनी म्हटलं आहे. या कारस्थाप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही शुक्लांनी दिले आहे.
 
आणखी वाचा : 
(राठोड दाम्पत्याने केली एव्हरेस्ट चढाई)
(राठोड दाम्पत्याकडून एव्हरेस्ट सर पोलिस दलातून कौतुकाचा वर्षाव : दुसर्‍या प्रयत्नात केली ध्येयपूर्ती)
 
 
 

Web Title: Nepal's 10-year ban on missing couple in Pune, Eve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.