पुतण्याचा डर्टी खेळ, आंघोळ करतानाचे अश्लील फोटो काढून काकीला केले ब्लॅकमेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 10:49 IST2022-11-18T10:48:25+5:302022-11-18T10:49:38+5:30
या सर्व प्रकाराला कंटाळून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न

पुतण्याचा डर्टी खेळ, आंघोळ करतानाचे अश्लील फोटो काढून काकीला केले ब्लॅकमेल
पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.. पुतण्याने काकीचे आंघोळ करतानाचे फोटो काढून ब्लॅकमेल करत प्रेम संबंध ठेवण्यास भाग पाडले. इतकेच नाही तर हे फोटो पती आणि जावयाला दाखवण्याची धमकी देत तिला वेळोवेळी बाहेर भेटण्यास भाग पाडले. या सर्व प्रकाराला कंटाळून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. 30 वर्षीय पुतण्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 40 वर्षीय काकीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
अधिक माहिती अशी की, अंदाजे चार वर्षांपूर्वी फिर्यादी या आंघोळ करत असताना आरोपीने त्यांचे फोटो मोबाईल मध्ये काढले. त्यानंतर हे फोटो फिर्यादीला दाखवून ब्लॅकमेल करून प्रेम संबंध ठेवण्यास भाग पाडले. चार वेळेस फिर्यादीला बाहेर भेटण्यासाठी बोलावले. तसेच ऐकले नाही तर हे फोटो पती आणि जावयाला दाखवून तुझी इज्जत घालवी अशी धमकी दिली. वारंवार होणाऱ्या त्याच्या या त्रासामुळे फिर्यादी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.