चिमणीसंवर्धनासाठी मुलांनी तयार केली घरटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:11 AM2021-03-20T04:11:02+5:302021-03-20T04:11:02+5:30
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक सुरेश थोरात, महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे पुणे विभागाचे कार्याध्यक्ष पी.बी.जगताप,वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शेरखान शेख, ...
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक सुरेश थोरात, महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे पुणे विभागाचे कार्याध्यक्ष पी.बी.जगताप,वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शेरखान शेख, श्रीकांत भाडळे, प्रभाकर चांदगुडे, बाळासाहेब गायकवाड, संगीता गवारी मान्यवर उपस्थित होते.
रखरखत्या उन्हात कासावीस झालेल्या चिमण्यांना मायेची ऊब म्हणून टाकाऊ पासून टिकाऊ प्रकल्पांतर्गत खोकी आणि प्लास्टिक कॅनपासून अनेक घरटी व गोळ्या बिस्किटांच्या प्लॅस्टिक बरण्यापासून धान्य व पाणी ठेवण्यासाठी आकर्षक भांडी तयार केली.तर काही विद्यार्थ्यांनी चिऊताईची तहान भागवण्यासाठी बिसलरी बाटलीतून पाणी व इवलीशी भूक भागवण्यासाठी एक घास चिऊचा,एक घास काऊचा असे म्हणत मुठभर धान्य देऊ केले.
स्वच्छ सुंदर शाळा प्रकल्पांतर्गत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील बालचमूंनी चिमण्यांच्या सुरक्षेसाठी कृत्रिम घरटी तयार केली. शालेय परिसरात आणि स्वतःच्या घराच्या परिसरात लावली आहेत. सध्या वाढता कडाक्याचा उन्हाळा यामुळे चिमण्या शाळेच्या इमारतीच्या व्हरांड्यात घिरट्या घालत असल्याने कासावीस झालेल्या चिमण्यांचे संरक्षण करण्यासाठी व्हरांड्यात ठिक-ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार केलेली कृत्रिम घरटी शिक्षकांच्या मदतीने बसवल्या बरोबर क्षणाचाही विलंब न लावता या घिरट्या घालणाऱ्या चिमण्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या कृत्रिम घरट्यांमध्ये विसावल्या गेल्या हे पाहून विद्यार्थी देखील खूप आनंदी झाले.
या कृत्रिम घरट्यांंमुळे चिमण्यांची संख्या वाढत आहे.चिमण्यांचा चिवचिवाट वाढला गेला जणूकाही चिऊ ताईची शाळा सुरू झाली की,काय असे वातावरण निर्माण झाले. या विद्यार्थ्यांच्या कृतीमुळे पक्षी संवर्धनाचा संदेश बाल मनावर कोरला गेल्याने या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाचे धडे गिरवत असताना आठवूनी काऊचा घास घेऊन चिमण्यांचा संवर्धनाचा ध्यास असे चित्र या शालेय परिसरात आज जागतिक चिमणी दिनाच्या दिवशी पाहावयास मिळाले.या उपक्रमाचे कौतुक पर्यावरणप्रेमी युवक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल संभाजी गवारे यांनी केले.
--
फोटो क्रमांक : १९तळेगाव ढमढेरे चिमणी
फोटो ओळ: श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे बालचमूंनी चिमणी संवर्धनासाठी कृत्रिम घरटी, अन्न-पाणी ठेवण्यासाठी तयार केलेली भांडी दाखवताना विद्यार्थी यावेळी उपस्थित मान्यवर