NET Exam: ‘नेट’ परीक्षा जूनमध्ये; १० मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करा
By प्रशांत बिडवे | Published: April 21, 2024 04:43 PM2024-04-21T16:43:56+5:302024-04-21T16:44:31+5:30
ज्युनिअर रिसर्च फेलाेशिप तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक पदावर नियुक्तीसाठी नेट परीक्षा उत्तीर्ण हाेणे गरजेचे
पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणी युजीसी नेट- २०२४ परीक्षेचे येत्या १६ जून राेजी आयाेजन करण्यात आले आहे. युजीसी- नेट जून २०२४ परीक्षेसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून विद्यार्थ्यांना दि. १० मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.
ज्युनिअर रिसर्च फेलाेशिप तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक पदावर नियुक्तीसाठी नेट परीक्षा उत्तीर्ण हाेणे गरजेचे आहे. तसेच युजीसीने जुन २०२४ पासून विविध ८३ विषयांमध्ये पीएच.डी ला प्रवेश घेण्यासाठी नेट परीक्षा अनिवार्य केली आहे.
जून मध्ये हाेणाऱ्या नेट परीक्षेसाठी १० मे पर्यंत ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येतील. दि. १२ मे पर्यंत परीक्षा शुल्क भरणे तसेच दि. १३ ते १५ मे या कालावधीत अर्जामध्ये दुरूस्ती करता येणार आहे. दि. १६ जुन राेजी परीक्षा हाेणार आहे. अर्ज भरणे तसेच परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी एनटीएच्या ugcnet.nta.ac.in संकेतस्थळाला भेट द्यावी.