अश्लील मेसेज पाठविणारा जाळ्यात

By admin | Published: June 22, 2017 07:24 AM2017-06-22T07:24:32+5:302017-06-22T07:24:32+5:30

मैत्रीण असल्याचे सांगून महिलांचे फेसबुक अकाउंटचे व्हेरिफिकेशन कोड मिळवायचे, त्या आधारे त्यांना बनावट नावाने अश्लील मेसेज पाठवायचे

In the net sending messaging | अश्लील मेसेज पाठविणारा जाळ्यात

अश्लील मेसेज पाठविणारा जाळ्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : मैत्रीण असल्याचे सांगून महिलांचे फेसबुक अकाउंटचे व्हेरिफिकेशन कोड मिळवायचे, त्या आधारे त्यांना बनावट नावाने अश्लील मेसेज पाठवायचे. असे प्रकार करणारा आरोपी सायबर क्राइम गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला. हिंजवडी पोलिसांकडे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
संदीप हरिबा घोलपे (कारेवाडी, येरोल, ता. उदगीर, जिल्हा लातूर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने अनेक महिलांचे फेसबुक अकाउंटचे व्हेरिफिकेशन कोड मिळविले. त्या आधारे त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून तो बनावट नावाने त्यांच्याशी अश्लील चॅटिंग करीत असे. एखाद्या महिलेने प्रतिसाद न दिल्यास तो महिलेचे फेसबुक प्रोफाईलमधील छायाचित्र क्रॉप करून घेत असे. ते छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर टाकून त्याखाली अश्लील कमेंट्स टाकत असे. या त्रासाला कंटाळून पाच महिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांना सर्व हकिगत सांगितली. सायबर सेलचे सहकार्य घेऊन आरोपीचा शोध घेतला. उद्गीर, लातूर येथील आरोपी घोलपे याला जेरबंद केले. त्याच्यावर पुण्यात मुंढवा, हडपसर, चतु:शृंगी या पोलीस ठाण्यांत विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: In the net sending messaging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.