पुणे-सोलापूर महामार्गावर ‘नेटवर्क’ वीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:21+5:302021-04-04T04:11:21+5:30

-- उरुळी कांचन : पुणे- सोलापूर महामार्गावरील पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, कोरेगाव मुळ, उरुळी ...

Network Week on Pune-Solapur Highway | पुणे-सोलापूर महामार्गावर ‘नेटवर्क’ वीक

पुणे-सोलापूर महामार्गावर ‘नेटवर्क’ वीक

Next

--

उरुळी कांचन : पुणे- सोलापूर महामार्गावरील पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, कोरेगाव मुळ, उरुळी कांचन परिसरातील ग्राहकांना मागील काही महिन्यांपासून आयडिया व्होडाफोन या कंपनीच्या मोबाईल नेटवर्क समस्येमुळे कॉल ड्रॉप होणे, आवाज ऐकायला न येणे, फोन ज्याला लावला आहे तो सोडून दुसरीकडेच लागणे, क्रॉस कनेक्शन होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने पूर्व हवेलीतील आयडिया होडाफोन या कंपनीचे ग्राहक चांगलेच मेटाकुटीला आले आहेत.

पूर्व हवेलीतील नागरिकांनी आयडिया होडाफोन कंपनीचे पोस्टपेड चॉईस नंबर एक हजार रुपयांपासून ते वीस हजार रुपये किमतीपर्यंत खरेदी केले होते. सुमारे सत्तर टक्के लोकांनी आयडिया होडाफोन या कंपनीचे नेटवर्कला प्राधान्य दिले होते.मात्र फोन न लागणे, आवाज अस्पष्ट येणे, फोन दुसरीकडे लागणे, क्रॉस कनेक्शन होऊन फोन लागणे, स्वतःचा आवाज स्वतःलाच येणे, आदी तक्रारी मुळे ग्राहक त्रासले आहेत.

या नेटवर्क समस्यांमुळे बँकिंग सेवेवर परिणाम होत आहे. प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल फोनवर फोन पे, गूगल पे, अमेझॉन पे, भारत पे, पेटीयम यासारख्या डिजिटल व्यवहार करण्यासाठी नेटवर्क नसल्याने ग्राहकांचे व्यवहार खोळंबलेले दिसत आहेत.

सध्या पूर्व हवेलीतील सर्वच भागात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनींचे टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता टॉवरची संख्या व कार्यशक्ती कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. कॉल ड्रॉप आणि रेंज प्रॉब्लेम या समस्यामुळे आयडिया कंपनीचे ग्राहक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. एकीकडे नेट पॅक आणि मोफत व्हॉइस कॉलकरिता आकर्षक सवलती जाहीर करून ग्राहकांना आकर्षित करतात.

------

हेल्पलाईनकडूनही समाधानकारक उत्तर नाही

मात्र नेटवर्क सेवेच्या माध्यमातून मिळणाऱ्या गचाळ सेवेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

झालेल्या गैरसोयीची तक्रार संबंधित कंपनीकडे केली असता त्या कंपनीकडून न मिळणाऱ्या प्रतिसादाने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीच दखल न घेता तशीच सेवा पुढे सुरू असते. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांनी कोणाकडे दाद मागायची व या समस्येचे कोणाकडून निराकरन होईल याची वाट पूर्व हवेलीतील आयडिया होडाफोन कंपनीचे ग्राहक पाहत आहेत.

संतप्त प्रतिक्रिया.... मागील काही वर्षांपासून आयडिया या कंपनीचे सिमकार्ड वापरत आहे. परंतु इतकी गचाळ सेवा आजपर्यंत अनुभवली नव्हती वारंवार कंपनीला फोन करुन तक्रार केली असता आठ दिवसात ठीक होईल,‌ दहा दिवसांत ठीक होईल अशी उत्तरे मिळत आहेत. त्या

Web Title: Network Week on Pune-Solapur Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.