नियोजनशून्य उड्डाणपूल

By admin | Published: May 16, 2017 06:49 AM2017-05-16T06:49:06+5:302017-05-16T06:49:06+5:30

नियोजन आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळेच हडपसरमधील वाहतूककोंडी जैसे थे आहे. चार उड्डाणपूल होऊनही वाहनचालक वाहन

Neutral flyovers | नियोजनशून्य उड्डाणपूल

नियोजनशून्य उड्डाणपूल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हडपसर : नियोजन आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळेच हडपसरमधील वाहतूककोंडी जैसे थे आहे. चार उड्डाणपूल होऊनही वाहनचालक वाहन चालविताना, तर नागरिक रस्ता ओलांडताना दररोज तारेवरची कसरत करीत आहेत. ज्येष्ठ नागरिक, शाळा-महाविद्यालयातील मुलांना जीव मुठीत धरून दररोज ये-जा करावी लागत आहे. पुण्याचे प्रवेशद्वार म्हणून नाही, तर वाहतूककोंडीत हरवलेले हडपसर हीच मोठी ओळख बनली आहे.


हडपसरमधील पहिलावहिला गाडीतळ ते डांगमाळी तालीम असा ९०० मीटर लांबीचा पूल पूर्ण झाला. या पुलाचे उद्घाटनही दोनदा झाले. त्यानंतर मगरपट्टा चौकात वाहतूककोंडी होत असल्यामुळे
पुन्हा तेथे दुसरा उड्डाणपूल उभारला.
त्यानंतर गाडीतळावरून सासवडकडे जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूककोंडी होत असल्यामुळे एल आकाराच्या पूल करण्यात आला. सासवडकडून पुण्याकडे जाणारा पूल झाल्यानंतर पुलाच्या बाजूला पथारीवाल्यांसाठी बांधलेली दुकाने पाडली आणि पुन्हा बंटर बर्नाट स्कूलची भिंंत आतमध्ये सरकवून तेथे त्यांना दुकानांसाठी गाळे बांधले. आता पुण्याकडून सासवडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उड्डाणपूल करण्यात आला. एकापाठोपाठ चार उड्डाणपूल झाले, तरीही हडपसरमधील वाहतूककोंडी का सुटत नाही, हा प्रश्न गंभीर आहे.
हडपसरमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ५ किलोमीटर लांबीच्या नियोजित उड्डाणपुलाची लांबी अवघी ९०० मीटरवर आणली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वत:च्या प्रॉपर्टी वाचविण्यासाठी पूल लांबविल्याचे नागरिकांनी सांगितले. हडपसरमध्ये उड्डाणपूल झाला; मात्र त्यामुळे वाहतूककोंडी सुटण्याऐवजी जटिल बनल्याने नागरिक त्रस्त झाले.
आकाशवाणी ते वैदूवाडी चौकादरम्यानच्या पुलावर मगरपट्टा चौकात नगर रोडकडे जाण्यासाठी आणि गाडीतळावरून सासवडकडे जाण्यासाठी एल अशी या पुलाची रचना होती. मात्र, प्रत्यक्षात तो गाडीतळ ते डांगमाळी तालीम म्हणजे अवघा ९०० मीटर लांबीचा झाला. त्यामुळे गांधी चौकातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत झाली. मात्र, मगरपट्टा चौक आणि गाडीतळावर कोंडी जैसे थे राहिली. त्यामुळे पुन्हा मगरपट्टा चौकात उड्डाणपूल बांधला आणि आता गाडीतळावर सासवडकडून पुण्याकडे
जाण्यासाठी पूल
बांधला.

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : आकुर्डी रेल्वे स्थानक रस्त्यावर शनिवारी एका मोटारीने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या तुषार राजू केंदळे (वय २५,रा. शिंदेवस्ती, रावेत) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत तुषारचे काका प्रवीण केंदळे (वय ३७, रा. शिंदेवस्ती, रावेत) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुषार शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना त्याला एका अज्ञात मोटारीने जोरात धडक दिली. यामध्ये तुषार हा गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुचाकीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.


संरक्षक कठडे उंच हवेत
पुलाला उभारलेले संरक्षक कठडे अत्यंत कमी उंचीचे आहेत. मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलावरील कठड्याला धडकून दुचाकीस्वार थेट जमिनीवर आदळला होता; मात्र सुदैवाने तातडीने उपचार केल्यामुळे तो वाचला. पाचही उड्डाणपुलांच्या संरक्षक कठड्याची उंची वाढवण्याची गरज आहे. कठड्याची उंची कमी असल्यामुळे पुलावरून वाहन चालवतानाही धोकादायक वाटू लागत असल्याने चालकांनी सांगितले.

1सोलापूर रस्त्यावरील हडपसरमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी
वीस वर्षांपूर्वी पाच किलोमीटर लांबीच्या पुलाचे नियोजन केले.
मगरपट्टा चौकातीलकोंडी सोडविण्यासाठी नियोजनशून्य पूल उभारला. अवघ्या
पाच किलोमीटर अंतरारामध्ये चार उड्डाणपूल होऊनही वाहतूककोंडी
सुरळीत होण्याऐवजी अत्यंत धोकादायक बनली आहे.
2शहराबरोबर उपनगराचा विस्तार झपाट्याने झाला आणि कोंडीचा
प्रश्न गंभीर बनू लागला. त्यावर उपाय म्हणून उड्डाणपुलाचा पर्याय समोर आला. दूरदृष्टी नसल्यामुळेच सोलापूर आणि सासवड रस्त्यावरील वाहतूककोंडी दिवसेंदिवस जटिल बनत आहे.
पुढील ५० वर्षांचा विचार करून नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मात्र, ते होताना दिसत नसल्याची खंत सुज्ञ मंडळींनी व्यक्त केली.

Web Title: Neutral flyovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.