महापौर चषक कधी

By admin | Published: November 16, 2014 12:14 AM2014-11-16T00:14:06+5:302014-11-16T00:14:06+5:30

महापालिकेकडून भरविल्या जाणा:या महापौर चषक स्पर्धासाठी क्रीडा समिती आणि प्रशासनाकडे वेळच नसल्याचे चित्र आहे.

Never Mayor Cup | महापौर चषक कधी

महापौर चषक कधी

Next
पुणो : शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ मिळावे; तसेच शिक्षण मंडळाच्या शाळांमध्येही आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत, या उद्देशाने महापालिकेकडून भरविल्या जाणा:या महापौर चषक स्पर्धासाठी क्रीडा समिती आणि प्रशासनाकडे वेळच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू होऊनही या स्पर्धाच्या आयोजनाबाबत पालिका प्रशासन अद्याप ढीम्मच आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धाची जबाबदारी घेण्यासाठी पालिका प्रशासनाकडे अधिकारीच नसल्याने या स्पर्धाचे नियोजन अजून कागदावरही आलेले नाही. 
 महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणा:या मुलांसाठी दर वर्षी पालिकेकडून सुमारे 26 खेळांच्या स्पर्धा महापौर चषक क्रीडा स्पर्धा अंतर्गत भरविल्या जातात, त्यात काही इनडोअर, तसेच काही आऊट डोअर स्पर्धाचा समावेश आहे. त्यात बुद्धिबळापासून लंगडीर्पयतच्या मैदानी खेळांचा समावेश आहे. 
या स्पर्धाचे सर्वाधिकार महापौरांना असून, त्याचे नियोजन करण्याचे अधिकार महापालिकेच्या क्रीडा समितीला आहेत. या स्पर्धा पालिकेकडून संपूर्ण वर्षभर नियोजन करून घेतल्या जातात, त्यातील  बुद्धिबळासारख्या इनडोअर स्पर्धा पावसाळ्यात घेतल्या जातात, तर मैदानी आऊटडोअर खेळल्या जाणा:या काही स्पर्धा दिवाळीच्या सुटीत, नाताळाच्या सुटीत घेतल्या जातात. या स्पर्धामध्ये मुलांना सहभाग घेता यावा, यासाठी या प्रामुख्याने शालेय सुटय़ांमध्ये घेतल्या जातात. मात्र, गेल्या काही वर्षापासून या स्पर्धाच्या आयोजनात एकवाक्यता नसल्याने अंदाजपत्रकात या स्पर्धासाठी राखीव असलेले बजेट खर्ची पाडण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात या स्पर्धा घाईगडबडीने घेण्याचा पायंडा पाडला जात आहे. त्याचीच प्रचिती या वर्षीही येत आहे. नोव्हेंबर महिना उजाडाला असला, तरी या स्पर्धाबाबत काहीच हालचाली प्रशासन, तसेच क्रीडा समितीकडूनही करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे यंदाही या स्पर्धा शाळांच्या परीक्षांच्या काळात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
 
आपल्याच संस्थांना काम देण्यासाठी सदस्यांची धडपड 
4महापौर चषक स्पर्धाचे नियोजन ढासळण्यामागे या स्पर्धाच्या आयोजनासाठी नेमण्यात येणा:या क्रीडा संस्थांच्याही वादाचे कारण असल्याची चर्चा आहे. या स्पर्धाचे आयोजन करण्यासाठी नेमण्यात येणा:या संबंधित खेळांच्या अधिकृत संघटना कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संघटित आहेत. 
4त्यामुळे या स्पर्धा आपल्याशी निगडित संघटनेलाच मिळाव्यात, यासाठीही महापालिकेच्या पदाधिका:यांपासून क्रीडा समितीच्या सदस्यांमध्ये वाद आहेत. या वादाचा फटका दरवर्षीच या स्पर्धाना बसत असल्याचे चित्र आहे.
 
क्रीडा समितीलाच नाही गांभीर्य
या स्पर्धाच्या आयोजनाची प्रमुख जबाबदारी क्रीडा समितीकडून पार पाडली जाते. कोणते खेळ केव्हा घ्यायचे, त्यासाठी कोणत्या संस्थांची नेमणूक करायची, हे समिती पाहते. मात्र, या वर्षी आधी आलेली लोकसभा आणि नंतर झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे स्पर्धाचे निर्णय झाले नसल्याचे समितीकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात समितीच्या बैठकांमध्ये अध्यक्ष आणि केवळ एकच सदस्य हजर असणो, तर कधी अधिकारीच नसणो यामुळे या स्पर्धाना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. तर, याकडे समितीचे सदस्यही गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही.

 

Web Title: Never Mayor Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.