न्यू आर्ट्स महाविद्यालय ‘पुरुषोत्तम’चा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 04:35 AM2019-09-16T04:35:22+5:302019-09-16T04:35:27+5:30
‘अरे आवाज कुणाचा' च्या आरोळ्यानी दणाणून गेलेला परिसर.. संघामध्ये पसरलेली अस्वस्थता आणि उत्सुकता...
पुणे : ‘अरे आवाज कुणाचा' च्या आरोळ्यानी दणाणून गेलेला परिसर.. संघामध्ये पसरलेली अस्वस्थता आणि उत्सुकता... अशातच प्रथम क्रमांकासाठी नगरच्या न्यू आटर््स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे' नाव उच्चारले गेले आणि विद्यार्थ्यामध्ये एकच जल्लोष झाला. यंदाचा पुरुषोत्तम करंडक अहमदनगरनेच पटकाविण्याची हॅटट्रिक केली. २०१७ मध्ये नगरच्याच न्यू आटर््सने तर, २०१८ मध्ये पेमराज सारडा महाविद्यालयाने करंडक पटकाविला असल्यामुळे सलग तीन वर्षे पुरुषोत्तम करंडकाचे विजेतेपद पुण्याबाहेरच्या महाविद्यालयाकडे गेले आहे.
न्यू आटर््स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या लाली एकांकिकेने सांघिक विजेतेपदासह पुरुषोत्तम करंडकावर आपली मुद्रा उमटविली. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या फ्याड एकांकिकेने द्वितीय क्रमांकासह हरि विनायक करंडक तर, श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्याालयाच्या टॅन्जंट एकांकिकेने तृतीय क्रमांकासह संजीव करंडक पटकाविला.