न्यू आष्टी - अहमदनगर नवीन रेल्वे लाईनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By नितीश गोवंडे | Published: September 23, 2022 01:27 PM2022-09-23T13:27:44+5:302022-09-23T13:27:58+5:30

१२० वंदे भारत रेल्वेचे कोच लातूरमध्ये बनवणार - रावसाहेब दानवे

New Ashti Ahmednagar new railway line inaugurated by Chief Minister | न्यू आष्टी - अहमदनगर नवीन रेल्वे लाईनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

न्यू आष्टी - अहमदनगर नवीन रेल्वे लाईनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Next

पुणे: न्यू आष्टी-अहमदनगर रेल्वे लाईनचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केले. यावेळी न्यू आष्टी रेल्वे स्थानकावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, सुजय विखे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी आष्टी येथून सुटणाऱ्या पहिल्या डेमू पॅसेंजर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.  शुक्रवारी (२३ सप्टेंबर) पहिल्या न्यू आष्टी ते अहमदनगर टप्प्यातील ६६ किलोमीटरची ब्रॉडगेज लाईन प्रवाशांसाठी खुली करण्यात आली.   

६६ किलोमीटर लांबीची नवीन आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाईन ही २६१ किलोमीटर अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे. यात केंद्र शासन आणि राज्य सरकार यांचा ५०-५० टक्के खर्चाचा वाटा आहे. त्याचे शुक्रवारी उदघाटन करण्यात आले. यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगाला चालना मिळणार असून, त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे

१२० वंदे भारतचे कोच बनणार मराठवाड्यात..

मुंबईचा या कार्यक्रमा वेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देशात सुरू होणाऱ्या ४०० वंदे भारत रेल्वे पैकी १२० रेल्वेचे कोच लातूरमध्ये बनवण्यात येणार असल्याचे सांगितले. लवकरच यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री देखील लातूरला येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Web Title: New Ashti Ahmednagar new railway line inaugurated by Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.