संतापजनक! मुलगी झाली म्हणून फेकून दिली शेताच्या बांधावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 05:27 PM2019-07-19T17:27:42+5:302019-07-19T18:08:48+5:30

बागायती शेती असलेला सधन भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यात जन्माला आलेली मुलगी शेताच्या बांधावर फेकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. 

The new born girl child threw on the farm | संतापजनक! मुलगी झाली म्हणून फेकून दिली शेताच्या बांधावर

संतापजनक! मुलगी झाली म्हणून फेकून दिली शेताच्या बांधावर

Next

पुणे : बागायती शेती असलेला सधन भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यात जन्माला आलेली मुलगी शेताच्या बांधावर फेकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, काठापूर शिंगवे (ता.शिरूर) येथे ही घटना घडली. या गावातील पारगाव रस्त्यावर नुकतेच जन्मलेली मुलगी कपड्यात गुंडाळून शेताच्या बांधावर ठेवली होती. शेतात कामाकरिता गेलेल्या यशवंत केदारी व सुशीला झिंग्रे यांनी ही बाळ पहिल्यांदा बघितले. त्यानंतर तात्काळ गावाचे सरपंच आणि इतरांना बोलावण्यात आले. या बाळाला टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे सामान्य उपचार झाल्यावर तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान  अर्भकांला टाकून दिल्य प्रकरणी अज्ञात पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत ड़ॉ. कृष्णा चव्हाण म्हणाले की, ' हे बाळ पहाटे जन्मलेले असावे. बाळाला वरवर बघता कोणतीही इजा झाली नसून त्याची तब्येतही उत्तम आहे'. या प्रकरणी पोलीस नाईक  संजय जाधव , अजित पवार अधिक तपास करत आहेत. 

बागायती भागामधील घटना 

टाकळी हाजी बेट भागासह काठापूर हे समृद्ध गाव आहे. या भागामधे पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. दरम्यान सधन भागातही अशी घटना घडल्याने मुलगी अजूनही नकोशी आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Web Title: The new born girl child threw on the farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.