चर्चा तर होणारच! थेट गाडीच्या बोनेटवर बसून 'नवरी' पोहोचली लग्नमंडपात, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 03:39 PM2021-07-13T15:39:30+5:302021-07-13T15:56:25+5:30

दिवे घाटातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल; वधूसमवेत चालक, व्हिडिओग्राफर तसेंच गाडीतील इतरांवर गुन्हा दाखल

new bride Sitting directly on the bonnet of the car in the wedding tent | चर्चा तर होणारच! थेट गाडीच्या बोनेटवर बसून 'नवरी' पोहोचली लग्नमंडपात, व्हिडीओ व्हायरल

चर्चा तर होणारच! थेट गाडीच्या बोनेटवर बसून 'नवरी' पोहोचली लग्नमंडपात, व्हिडीओ व्हायरल

Next
ठळक मुद्देपुणे पोलीस या नवरी मुलीवर आणि तिच्या कुटुंबियांवर कारवाई करतात का?

पुणे: नवं विवाहित जोडपी लग्नाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पना आणताना दिसून येत आहेत. कोरोना काळात मर्यादित लोंकाची परवानगी असल्याने आता  जोडप्यांना हटके लग्न करण्याच्या पद्धती सुचत आहेत. आपले लग्न आयुष्यभर अनेकांच्या लक्षात राहावे यासाठी विमानात, समद्रकिनारी, निसर्गाच्या सानिध्यात, ग्रामीण भागात लग्न करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहील असाच पराक्रम भोसरीतील एका नवरी मुलीने केला आहे. तिने घरापासून लग्नमंडपापर्यंतच्या प्रवासात थेट गाडीच्या बोनेटवर बसण्याचे धाडस केले आहे. पुण्यातील दिवे घाटात कायद्याची पायमल्ली करणारी घटना उघडकीस आली आहे. दिवे घाटातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र, हे प्रयत्न करत असताना काही अतिउत्साही जोडप्यांना कायद्याच्या धाकाचाही विसर पडल्याचं पाहण्यात येत आहे.

सासवड जवळील सिध्देश्वर मंगल कार्यालयात आज या नवरी मुलीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. मात्र, या उत्साही नवरी आणि तिच्या कुटुंबियांना चक्क कायद्याचा धाकाचा विसर पडला आहे. धोकादायक रीतीने प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे. आता पुणे पोलीस या नवरी मुलीवर आणि तिच्या कुटुंबियांवर कायदेशीर कारवाई करतात का याकडे सर्वांच लक्ष लागून आहे. नवरीने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी आपल्या चारचाकी गाडीच्या बोनेटवर बसून मिरवत थेट दिवे घाटात मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास केला आहे. 

वधूसमवेत चालक, व्हिडिओग्राफर तसेंच गाडीतील इतरांवर गुन्हा दाखल 

मास्क न वापरता वधूराणीला मोटारीच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालयाच्या दिशेने व्हिडिओ शुटींग करत प्रवास करणे महागात पडले आहे. लोणी काळभोर पोलीसांनी वधूसमवेत चालक, व्हिडिओग्राफर तसेंच गाडीतील इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वधू शुभांगी शांताराम जरांडे ( वय २३ ), मोटार चालक गणेश श्यामराव लवांडे ( वय ३८, दोघे रा भोसरी, पुणे ) व व्हिडिओग्राफर तुकाराम सौदागर शेडगे (वय २३ रा. वाल्हेकरवाडी आकुर्डी) अशी त्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नासाठी जात असताना उत्साहाच्या वधू दिवे घाटातून चक्क मोटारीच्या बोनेटवर बसून मंगलकार्यालयाच्या दिशेने प्रवास करत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला. त्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक ए. एम. काटे यांना हे समजले. त्यांनी सदर ठिकाणी जाऊन चेहऱ्यावर मास्क न घालणे आणि जीवाला धोका निर्माण होईल. असे वर्तन केल्याप्रकरणी  गाडी चालक, नातेवाईक आणि फोटोग्राफर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच फोटोग्राफरचा कॅमेराही जप्त केला आहे.   

कोरोनाच्या संकटातही विशेष काळजी घेत सध्या अनेक ठिकाणी छोटेखानी विवाहसोहळे पार पडत आहेत. असे असले तरी आजकालच्या सोशल मिडियाच्या युगात लग्न सोहळ्यांचा ट्रेंड पूर्णतः बदलून गेला आहे. त्यातच आताच्या मुली बैलगाडी, घोडा, हॅलिकॅप्टरने लग्नमंडपात रॉयल एण्ट्री करू लागल्या आहेत. असे असताना आपल्या जिवितास धोका होऊ शकतो हे त्या साफ विसरत आहेत. असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले आहे.  

Web Title: new bride Sitting directly on the bonnet of the car in the wedding tent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.