महापालिकेकडून नवीन कोरोना नियमावली जाहीर; पुणेकरांवर आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 06:45 PM2021-03-20T18:45:09+5:302021-03-20T19:14:53+5:30

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी काढले आदेश....

New Corona Rules announced for Punekars ; Read detailed | महापालिकेकडून नवीन कोरोना नियमावली जाहीर; पुणेकरांवर आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता

महापालिकेकडून नवीन कोरोना नियमावली जाहीर; पुणेकरांवर आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता

Next

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात नवे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्तांनी याबाबतचा आदेश काढला आहे. यात सर्व प्रकारच्या आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, मागील 3 ते 4 दिवसांपासून शहरात तीन हजारांवर रुग्ण सापडत असल्याने पुणेकरांवर आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय उद्या जाहीर होऊ शकतो. 

पुण्यातील कोरोनाचा वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महापौर मुरलीधर मोहोळ आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर पुणेकरांवर कडक बंधने आणण्यासंबंधीच्या प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती आहे.

महापौरांनी मागील आठवड्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नाही असे जाहीर केले होते. मात्र, कोरोना बाधितांची संख्या याच प्रमाणात वाढत राहिली तर पुणेकरांवर आणखी  कडक निर्बंध आणण्याविषयीचे संकेत दिले होते.

आजच्या आदेशात, पुणे शहरात सर्व  प्रकारच्या राजकीय,सांस्कृतिक,सामाजिक धार्मिक, कार्यक्रमांना बंदी असणार आहे. तसेच लग्न समारंभासाठी ५० तर अंत्यविधीसाठी केवळ २० जणांनाच उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आलेली आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढीत वेगाने वाढ होत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांकडून नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. मात्र याउलट बहुतांश ठिकाणी नियम सर्रास धाब्यावर बसवलेले पाहायला मिळत आहे.गेल्या महिन्याभरात सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजारांवर पोहचली आहे.

नवीन आदेशात अत्यावश्यक सेवांना सवलत देण्यात आली आहे. 
====
आयुक्तांच्या आदेशामध्ये सर्व प्रकारचे खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

परंतु, शासकीय , निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत प्रमुखांनी निर्णय घ्यावा.

शहरातील नाट्यगृहे 50 टक्के आसन क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा

. मात्र, याचवेळी कोविड बाबतच्या सर्व  आदेशांचे पालन होणे आवश्यक असणार आहे.

उत्पादन क्षेत्र पूर्ण क्षमतेने सुरू ठेवता येतील. पण त्या ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे पालन होईल अशा प्रकारे उपस्थितीबाबत नियोजन करावे लागणार आहे.  

* नागरिक व कर्मचाऱ्यांना विनामास्क प्रवेश देता कामा नये. 
* प्रवेशद्वारावर थर्मामिटरद्वारे तपासणी करण्यात यावी. 
* सॅनिटायझर चा वापर उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे.
* कोरोना नियमावलीचे पालन होते की नाही यासाठी कर्मचारी नियुक्त करावे. 
* सदर नियमांचा भंग झाल्यास केंद्र शासन कोविड आपत्ती संपूर्णपणे संपली असे जाहीर करत नाही तोपर्यंत संबंधित आस्थापना बंद ठेवण्यात  येतील. तसेच आस्थापना मालकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. 
* संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, मार्गदर्शक सूचना, पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील. 
..........

महत्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे: 
1. प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील मॉल, थिएटर, रेस्टॉरंट, बार, फूट कोर्ट यांना रात्री 10 पर्यंतच मुभा
2. घरपोच जेवणाची सुविधा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार
3. प्रतिबंधात्मक सूचनांची माहिती दर्शनीय भागात लावणे बंधनकारक
4  धार्मिक स्थळांमधील प्रवेशावर मर्यादा, आॅनलाइन पासची सुविधा
5. लग्नसमारंभासाठी केवळ 50 जणांना उपस्थित राहता येईल.
6. अंत्यविधीसाठी केवळ 20 जणांना परवानगी
====
* शहरातील सर्व आस्थापनांमध्ये विनामास्क प्रवेश नाही.
* प्रवेशद्वारावर थर्मामिटर, थर्मल गन, पल्स आॅक्सिमीटर ठेवण्यात यावा.
* हॅन्ड सॅनिटायझर ठेवणे.
* सुरक्षित अंतर राखले जाईल याकडे लक्ष देणे.

Web Title: New Corona Rules announced for Punekars ; Read detailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.