नवीन घरकुल योजनेत ‘त्या’ लाभार्थींना संधी
By admin | Published: April 11, 2015 05:15 AM2015-04-11T05:15:23+5:302015-04-11T05:15:23+5:30
घरकुलच्या प्रतिक्षा यादीतील लाभार्थींना नवीन योजनेत प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन महापालिकेचे सहायक आयुक्त नेमीनाथ दंडवते यांनी दिल्याचे डीवायएफआयने पत्रकात म्हटले आहे.
पिंपरी : घरकुलच्या प्रतिक्षा यादीतील लाभार्थींना नवीन योजनेत प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन महापालिकेचे सहायक आयुक्त नेमीनाथ दंडवते यांनी दिल्याचे डीवायएफआयने पत्रकात म्हटले आहे.
संघटनेतर्फे स्वस्त घरकुल योजनेच्या विषयी धरणे आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाने सहायक आयुक्त दंडवते यांना निवेदन दिले.या वेळी दंडवते म्हणाले की, प्रतिक्षा यादीतील लाभार्थींना पहिल्या टप्प्यात जे लाभार्थी कमी पडतील त्यांच्या जागी लवकरच समाविष्ट केले
जाणार आहे. त्यांच्याकडून ५० हजार रुपयांत पहिला हप्ता भरून घेण्यात येईल. घरकुल योजनेच्या विरोधात दाखल केलेली याचिका निकालात निघाली असून बंद पडलेल्या घरकुलांचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल.
याशिवाय घरकुल योजनेमध्ये अनेक गैरप्रकार सुरू आहेत. घरे भाड्याने देणे, परस्पर विकण्याच्या गोष्टीचीही कुजबुज होत आहे. असा कोणताही प्रकार उघडकीस आला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिष्टमंडळामध्ये शहर उपाध्यक्ष राजाराम निकम, गणेश दराडे,
जनवादी महिला संघटनेचे
जयश्री साळोखे, अविनाश लाटकर, धुमाळ, सविता करपे आदींचा समावेश होता. दराडे व निकम यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनाला अनेक लाभार्थी हजर होते.(प्रतिनिधी)