पुण्याच्या म्हाडा लॉटरीसाठी अर्ज केलाय? नवी तारीख आली, एका क्लिकवर सगळी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 06:30 PM2024-11-12T18:30:18+5:302024-11-12T18:31:54+5:30

Pune Mhada Lottery new Date: १० ऑक्टोबर रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली.

New date of MHADA Pune lottery has arrived; Extension of time till December 10 for sale of 6294 houses  | पुण्याच्या म्हाडा लॉटरीसाठी अर्ज केलाय? नवी तारीख आली, एका क्लिकवर सगळी माहिती...

पुण्याच्या म्हाडा लॉटरीसाठी अर्ज केलाय? नवी तारीख आली, एका क्लिकवर सगळी माहिती...

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : म्हाडाच्यापुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी - चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ६ हजार २९४ घरांच्या विक्रीकरिता आयोजित सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार पुणे मंडळाच्या कार्यालयात ७  जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सोडत काढली जाईल.

१० ऑक्टोबर रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार व सुविधा मिळावी यासाठी सोडतीकरिता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ पर्यंत अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे.

१० डिसेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. १२ डिसेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाईल. १३ डिसेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आर टी जी एस / एन ई एफ टी द्वारे अनामत रकमेचा भरणा करता येईल.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत https://lottery.mhada.gov.in  या वेबसाइटवरुन  सहभाग घ्यावा. तसेच इतर योजनांकरिता   https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवरून सहभाग घ्यावा. 

  • प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २३४० घरे 
  • म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत ९३ घरे 
  • प्रधानमंत्री आवास योजनेत ४१८ घरे 
  • २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३३१२ घरे 
  • १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेत १३१ घरे

 

Web Title: New date of MHADA Pune lottery has arrived; Extension of time till December 10 for sale of 6294 houses 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.