अंदाजपत्रकातून पुन्हा नवी स्वप्ने

By admin | Published: January 10, 2016 03:57 AM2016-01-10T03:57:51+5:302016-01-10T03:57:51+5:30

मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात दाखवलेली स्वप्नं, स्वप्नंच राहिलेली असताना प्रशासनाने सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात नवी स्वप्न दाखवण्याची तयारी चालवली आहे.

New Dreams Against Budget | अंदाजपत्रकातून पुन्हा नवी स्वप्ने

अंदाजपत्रकातून पुन्हा नवी स्वप्ने

Next

पुणे : मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात दाखवलेली स्वप्नं, स्वप्नंच राहिलेली असताना प्रशासनाने सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात नवी स्वप्न दाखवण्याची तयारी चालवली आहे. जुन्या अंदाजपत्रकातील अनेक योजना अपुऱ्या आहेत, तर काही योजनांना साधी सुरुवातही होऊ शकलेली नाही. भामा-आसखेडसारखी पाणी योजना अर्धवट राहिली आहे, तर वाय मॅक्ससारख्या योजनेला मुहूर्तच लाभलेला नाही.
२०१५-१६ च्या अंदाजपत्रकाची मुदत आता पूर्ण होत आली आहे. अखेरचे काही महिने शिल्लक राहिले आहेत. या अंदाजपत्रकावर दृष्टिक्षेप टाकला असता पालिका प्रशासनाचे अपयशच नजरेत येते. पुण्याचा आय. टी. हब म्हणून देशभरात होणारा बोलबाला लक्षात घेऊन प्रशासनाने मागील वर्षी इंटरनेट कनेक्टिव्हिटी देणारे वाय-मॅक्स तंत्रज्ञान संपूर्ण शहरात सुरू करण्याचे अंदाजपत्रकात नमूद केले होते, त्याचा साधा आरंभही प्रशासनाला करता आलेला नाही. त्यासाठी केलेली १ कोटी रुपयांची तरतूद आता मार्च अखेरीस दुसरीकडे वर्ग करून वापरण्यात येईल. आय. टी. हब म्हणून पुण्याच्या लौकिकात भर टाकेल, असे काहीही पालिका प्रशासनाला करता आलेले नाही.
मैलापाणी शुद्धीकरण केंद्र, भामा-आसखेड योजनांच्या बाबतीतही असेच झाले आहे. भामा-आसखेड योजनेचे काही काम झाले, मात्र अजूनही ही योजना पूर्णाशांने सुरू झालेली नाही. केंद्र सरकारच्या निधीतून शहरात एकूण ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार होती. हे कामही पुर्ण झाले असे म्हणता येण्यासारखी स्थिती नाही. उड्डाणपुलांच्या बाबतीतही पालिका प्रशासनाला गती दाखवता आलेली नाही. शहरातील अनेक रस्त्यांवर आजही उड्डाणपुलांची गरज आहे. वाहतूक सुधारणेसाठी असे उड्डाणपुल बांधण्याला प्राधान्य देण्यात येणार होते. मात्र स्वारगेट, धनकवडी व संचेती येथील उड्डाणपूल वगळता प्रशासनाला यात यश आलेले नाही.

आर्थिक निकषावर भर : २२ नोव्हेंबरला दिल्लीत धडकणार
मागील वर्षाचे अंदाजपत्रक साडेचार हजार कोटी रूपयांचे होते. त्यातील योजना अशा अपुऱ्या राहिलेल्या असतानाच प्रशासन आता पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक
तयार करीत आहे. त्यामुळे त्यातूनही
हाती काय पडते हा प्रश्नच
आहे.
यंदाचे अंदाजपत्रक काही हजार कोटी रूपयांचे असणार आहे. त्यातही वाहतूक सुधारणेसाठी बीआरटी मार्गांचे जाळे, संपुर्ण शहराला २४ तास पाणी पुरवठा अशा काही स्वप्नवत वाटणाऱ्या योजनांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

Web Title: New Dreams Against Budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.