New Education Policy: एनईपी अंमलबजावणीसाठी खासगी संस्थांना सहकार्य- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 09:03 AM2023-06-23T09:03:03+5:302023-06-23T09:04:15+5:30

पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात राेजगाराभिमुख शिक्षण आणि मातृभाषेतून शिक्षण देण्याला महत्त्व दिले आहे...

New Education Policy: Cooperation with private organizations for implementation of NEP- Chandrakant Patil | New Education Policy: एनईपी अंमलबजावणीसाठी खासगी संस्थांना सहकार्य- चंद्रकांत पाटील

New Education Policy: एनईपी अंमलबजावणीसाठी खासगी संस्थांना सहकार्य- चंद्रकांत पाटील

googlenewsNext

पुणे : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खासगी शिक्षणसंस्थांना मार्गदर्शन करण्यासोबत त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पुणे विद्यार्थी गृह आणि ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्तांगण इंग्रजी विद्यालयात ‘उच्च शिक्षणाच्या खासगी संस्थांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यात व्यवस्थापनाची भूमिका’ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. टी.जी. सीताराम, उच्चशिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींंद्र कुलकर्णी, पुणे विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष सुनील रेडकर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात राेजगाराभिमुख शिक्षण आणि मातृभाषेतून शिक्षण देण्याला महत्त्व दिले आहे. तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी विषयाची पुस्तके लवकरच मराठीतून उपलब्ध हाेतील. मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या शोधकवृत्तीला आणि सृजनशीलतेला चालना मिळते. शैक्षणिक संस्थांनी परिसरातील उद्योगांशी जानेवारी महिन्यात चर्चा करून त्यांच्या गरजेनुसार नव्या अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव सादर करावेत, त्यास त्वरित मान्यता देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

संशोधन, उद्योजकता विकास, कौशल्य विकास, भारतीय मूल्यविचार हा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा गाभा आहे. हे धोरण निरंतर चालणाऱ्या अध्ययन प्रक्रियेवर आधारित आहे. शिक्षण सर्वसमावेशक आणि लोकशाहीकरणाचा हा प्रयत्न आहे. ८४ संस्थांमध्ये प्रादेशिक भाषेतील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

- प्रा. टी. जी. सीताराम, अध्यक्ष, एआयसीटीई

Web Title: New Education Policy: Cooperation with private organizations for implementation of NEP- Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.