महापालिकेच्या ईएसआयसी रुग्णालयास नवीन वीजजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:15 AM2021-04-30T04:15:09+5:302021-04-30T04:15:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापालिकेने सुरू केलेल्या मार्केटयार्ड येथील १०० खाटांच्या ईएसआयसी कोविड रुग्णालयास, महावितरणकडून ८० किलोवॅट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेने सुरू केलेल्या मार्केटयार्ड येथील १०० खाटांच्या ईएसआयसी कोविड रुग्णालयास, महावितरणकडून ८० किलोवॅट क्षमतेची नवीन वीजजोडणी तात्काळ कार्यान्वित करण्यात आली आहे.
महावितरण व महापालिकेच्या संयुक्त सहकार्याने या कोविड रुग्णालयाचा स्वतंत्र वीजपुरवठा गुरुवारी (दि. २९) दुपारी ३ वाजता सुरू करण्यात आला. कोविड रुग्णालय व आॅक्सीजन निर्मिती प्रकल्पांना नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाकडून महावितरणला देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे या स्वतंत्र कोविड रुग्णालयाला महावितरणने तात्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध करून दिली आहे.
या रूग्णालयांत ४० आॅक्सिजन खाटांचा समावेश असल्याने येथे वीजपुरवठ्यासाठी ८० किलोवॅट क्षमतेची नवीन वीजजोडणी आवश्यक होती. त्यामुळे महापालिकेकडून नवीन वीजजोडणीचा अर्ज महावितरणला सादर करण्यात आला होता़ आवश्यक पायाभूत वीजयंत्रणेची उभारणी पूर्ण झाल्यानंतर, आज दुपारी कोविड रुग्णालयाला स्वतंत्र नवीन वीजजोडणीद्वारे वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
----------