अस्वस्थतेतून मिळते नवीन ऊर्जा : श्रीपाल सबनीस; पुण्यात ‘अस्वस्थ’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:49 AM2018-01-30T11:49:26+5:302018-01-30T11:52:59+5:30
परिस्थिती आणि संघर्ष हे समीकरण सोबतीला असताना केलेले लेखन रसिकांना अस्वस्थतेतूनही नवीन ऊर्जा मिळवून देते, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
पुणे : परिस्थिती आणि संघर्ष हे समीकरण सोबतीला असताना केलेले लेखन रसिकांना अस्वस्थतेतूनही नवीन ऊर्जा मिळवून देते, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
मराठवाडा मित्रमंडळाच्या ज्ञानेश्वर सभागृहात कवी विक्रम शिंदे यांच्या ‘अस्वस्थ’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सबनीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे सचिव भाऊसाहेब जाधव, साहित्यिक प्रदीप आवटे, जाणीव जागृती फाऊंडेशनचे अवधूत बागल आदी उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, ‘प्रेम, संघर्ष, विचार, व्यक्ती, तत्त्वज्ञान अशा सर्व विषयांमधून काव्यात्मक अस्वस्थता विचार करायला लावणारी आहे.’
आवटे म्हणाले, ‘कविता सुचणे अवघड नाही; परंतु ती भावना जगणे अवघड आहे. कवीने आत्मपरीक्षण करून भावनेला न्याय द्यायला हवा.’
कविसंमेलनात अंकुश आरेकर, सचिन आशा सुभाष, अवधूत बागल, कुलदीप आंबेकर, विक्रम शिंदे, नितीन जाधव यांनी कविता सादर केल्या.