ग्रामीण भागात लग्नाचा नवा 'फंडा' ; ३०० ते ५०० वऱ्हाडी सर्रास लावतात हजेरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 02:21 PM2021-04-07T14:21:20+5:302021-04-07T14:21:51+5:30

पोलिसांकडून कारवाई ऐवजी चार-पाच हजार घेऊन केली जाते मांडवली...

A new ‘funda’ of marriage in rural areas; 300 to 500 public are in attendance | ग्रामीण भागात लग्नाचा नवा 'फंडा' ; ३०० ते ५०० वऱ्हाडी सर्रास लावतात हजेरी 

ग्रामीण भागात लग्नाचा नवा 'फंडा' ; ३०० ते ५०० वऱ्हाडी सर्रास लावतात हजेरी 

googlenewsNext

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ असल्याने राज्य शासनाकडून कडक निर्बंध लागू केले आहेत.  परंतु आज ही ग्रामीण भागात लग्न समारंभ धुमधडाक्यात सुरू असून, दारापुढे मंडप टाकून करण्यात येत असलेल्या लग्नात सर्रास 300-500 व-हाडी हजेरी लावत आहे. याकडे पोलिस मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, कारवाई करण्याऐवजी केवळ चार- पाच हजार रुपयांची माडवली करून शेकडोंच्या उपस्थितीला एक प्रकारे  संहमतीच देत आहेत. 

गेल्या एक महिन्यात शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा उद्रेकच झाला आहे. दोन-तीन हजारांच्या घरात असलेल्या रुग्ण संख्येने आता तब्बल बारा हजारांचा टप्पा क्रॉस केला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने 30 एप्रिल पर्यंत संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यात ग्रामीण भागात लग्न समारंभ व दशक्रिया विधीमध्ये शेकडो , हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहत असल्याचे लक्षात आल्यावर यावर देखील कडक निर्बंध घालत लग्नांसाठी  50 तर दशक्रिया विधीसाठी 20 लोकांची अट घातली आहे गेल्या एक वर्षांपासून ही अट लागू असली तरी लोक काही केल्या ऐकत नसून आजही ग्रामीण भागात लग्नासाठी 300-500 पट्टीत लोक उपस्थित राहतात. यामध्ये केवळ लग्न एखाद्या हाॅल मध्ये न करता नवरा किंवा नवरीच्या घरा समोर मंडप टाकून लग्न समारंभ अत्यंत धुमधडाक्यात केले जात आहे. 

जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातच दारापुढे लग्नाचा नवीन फंडा सुरू झाला आहे. परंतु या दारा पुढच्या लग्नात वऱ्हाड्यांच्या उपस्थितीकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. काही गावांत पोलिस कारवाईला जातात देखील पण केवळ चार-पाच हजार रुपयांची वसुली करून हजारोंच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करत आहे. ही बाब जिल्ह्यात कोरोनाचा आणखी उद्रेक होण्यास कारणीभूत ठरू शकते.

Web Title: A new ‘funda’ of marriage in rural areas; 300 to 500 public are in attendance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.