चाकण ते पुरंदर होणार नवा महामार्ग

By admin | Published: April 22, 2017 04:04 AM2017-04-22T04:04:10+5:302017-04-22T04:04:10+5:30

चाकण येथे होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरला हलविल्यानंतर चाकण परिसरात पसरलेली नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

The new highway will be from Chakan to Purandar | चाकण ते पुरंदर होणार नवा महामार्ग

चाकण ते पुरंदर होणार नवा महामार्ग

Next

पुणे : चाकण येथे होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरला हलविल्यानंतर चाकण परिसरात पसरलेली नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकण ते पुरंदरदरम्यान नवा महामार्ग बांधण्याची कल्पना मांडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रशासन कामाला लागले असून या रस्त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
चाकणला होऊ घातलेले विमानतळ पुरंदरला हलवण्यात आल्याने चाकणमधील नागरिकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली होती. चाकणवासीयांनाही पुण्याप्रमाणेच अगदी जलदगतीने पुरंदर विमानतळापर्यंत जाता यावे, प्रवासी आणि मालवाहतूक जलद व्हावी, याकरिता अन्याय झाल्याची मानसिकता दूर करण्यासाठी पुरंदरला ‘कनेक्टिव्हीटी’ देण्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी मांडला होता. चाकणपासून पुरंदरपर्यंत स्वतंत्र महामार्ग निर्माण करून ही कनेक्टिव्हिटी देण्याची कल्पना त्यांनी मांडली. पुरंदर विमानतळासाठीच्या भूसंपादन आणि पुढील प्रक्रियेला गती मिळाली असून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याचेही काम प्रगतिपथावर आहे. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या कल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी विभागीय आयुक्तस्तरावर प्रस्ताव तयार करण्यात येणार असून त्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Web Title: The new highway will be from Chakan to Purandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.