२५ हजार विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतीगृह उभारणार; कर्मचाऱ्यांनाही पगार वाढीचे आश्वासन - संजय शिरसाट
By अजित घस्ते | Updated: January 30, 2025 15:23 IST2025-01-30T15:22:59+5:302025-01-30T15:23:16+5:30
समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी समाज कल्याण आयुक्त व बार्टी कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा आढावा घेतला

२५ हजार विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतीगृह उभारणार; कर्मचाऱ्यांनाही पगार वाढीचे आश्वासन - संजय शिरसाट
पुणे: राज्यातील सामाजिक न्याय विभागातील सर्व वसतीगृहात विद्यार्थ्यांना आद्यवत सेवा सुविधा उपलब्ध करुन देऊन २५ हजार विद्यार्थ्यांसाठी नविन वस्तीगृह उभारण्यात येणार असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाठ यांनी बार्टी संस्थेत व्यक्त केले.
समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी समाज कल्याण आयुक्त व बार्टी कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा आढावा घेतला.यावेळी ते बोलत होते. तसेच समाज कल्याण व बार्टीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांने प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडावेत असे ही निर्देश दिले.
बार्टीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचे आश्वासन
गेल्या दहा वर्षापासून बार्टीतील १२०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढ झाली नाही. पगारवाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली असता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगारवाढ निश्चितच केली जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांनी समाजकल्याण मंत्री शिरसाट यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व जयभीम ही कविता भेट देऊन स्वागत केले. तसेच बार्टीतील विविध योजनांची माहिती देऊन बार्टीतील सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत असल्याचे सांगितले.
यावेळी विशेष कार्य अधिकारी अभय देशमुख, विभागप्रमुख श्रीमती स्नेहल भोसले, निबंधक इंदिरा अस्वार, उमेश सोनवणे, लेखाधिकारी योगिता झानपुरे यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.