झोपडपट्टी निर्मूलनामध्ये पुण्याचा नवा आदर्श

By admin | Published: February 17, 2015 11:46 PM2015-02-17T23:46:48+5:302015-02-17T23:46:48+5:30

येरवडा येथील महात्मा गांधीनगर आणि जयप्रकाशनगर येथील झोपडपट्टीधारकांचे बीएसयूपी मधील इन्स्टिट्यूटमधून पुनर्वसन करण्यात आले आहे.

New Ideal of Pune in eradicating the slum | झोपडपट्टी निर्मूलनामध्ये पुण्याचा नवा आदर्श

झोपडपट्टी निर्मूलनामध्ये पुण्याचा नवा आदर्श

Next

पुणे : येरवडा येथील महात्मा गांधीनगर आणि जयप्रकाशनगर येथील झोपडपट्टीधारकांचे बीएसयूपी मधील इन्स्टिट्यूटमधून पुनर्वसन करण्यात आले आहे. हे पुनर्वसन पूर्ण झाल्याने या जागेचा सातबारा नागरिकांच्या नावावर करण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय महापालिकेने दिला आहे.
त्यामुळे या ठिकाणची झोपडपट्टी विघोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या दोन्ही झोपडपट्टया राज्यातील पहिल्या विघोषित झोपडपट्टया ठरणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णेगुरूजी यांनी सोमवारी दिली.
येरवडा येथील सर्व्हे क्रमांक १०३ मध्ये असलेल्या सरकारी जमिनीवर जयप्रकाशनगर व महात्मा गांधीनगर झोपडपट्टी आहे. १९८३ ते ८६ या वर्षामध्ये या भागात गलिच्छ वस्ती निर्मूलन (गवनी) योजना वेळोवेळी घोषित झाली. त्यामुळे महापालिकेकडून गवनी, वाल्मीकी योजना आणि बेसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन पुअर (बीएसयूपी) योजनेअंतर्गत या भागातील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पुणे महापालिका तसेच राज्य सरकारच्या मागासवर्गीय कल्याण निधीतून या भागात भूमिगत गटारे, भूमिगत
विद्युत पुरवठा, प्रत्येक झोपडपट्टीला स्वतंत्र नळ कनेक्शन, गल्लीबोळात सिमेंट क्राँक्रिटचे रस्ते
सार्वजनिक शौचालये, महापालिकेची मराठी, इंग्रजी माध्यमाची शाळा, महापालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र, समाजमंदिरे, व्यायामशाळा यांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहेत.
या भागात मोठया प्रमाणात पक्क्या स्वरुपाचे बांधकाम झाले आहे. बहुतेक नागरिकांनी आरसीसी बांधकामही पूर्ण केले आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या दोन्ही झोपडपट्टया विकसित
झाल्याने येथे सध्या असलेल्या सोयी-सुविधांचा विचार करता भविष्यकाळात येथे देखभाल व दुरुस्तीसाठी मोठा निधी महापालिकेला द्यावा लागणार आहे.

या भागात विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी झोपडपट्टीवासीयांकडून घेण्यात येणारे सेवा शुल्क रद्द करून बांधण्यात आलेल्या इमारतींकडून मिळकतकर वसूल करणे गरजेचे आहे. यासाठी ही झोपडपट्टी विघोषित करून येथे गावठाण जाहीर करणे क्रमप्राप्त आहे. या झोपडपट्टीची जागा स्थानिक रहिवाशांच्या नावावर करावी, असा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष बापूराव कर्णे यांनी पालिकेला दिला होता. त्यावर प्रशासनाकडून अभिप्राय मागविण्यात आला होता. प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय देत झोपडपट्टी विघोषित करण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय दिला.

Web Title: New Ideal of Pune in eradicating the slum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.