केडगावला नवीन ज्वारीची आवक
By admin | Published: March 2, 2016 01:09 AM2016-03-02T01:09:05+5:302016-03-02T01:09:05+5:30
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केडगाव उपबाजारात नवीन ज्वारीची आवक सुरू झाली असून, बाजारभाव तेजीत निघाले
दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केडगाव उपबाजारात नवीन ज्वारीची आवक सुरू झाली असून, बाजारभाव तेजीत निघाले. दौंड तालुक्यात टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, वांगी, भोपळा, शेवगा यांचे बाजारभाव स्थिर निघाले, तर मिरची, कारली, भेंडी, दोडका, काकडी यांचे बाजारभाव तेजीत निघाले. लिंबाच्या आवकेत वाढ होऊन बाजारभाव स्थिर निघाले, तर भुसार मालाचे बाजारभाव स्थिर असल्याची माहिती सभापती ज्ञानदेव चव्हाण आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरीत्या दिली.
दौंड येथे भाजीपाल्याची आवक - (१0 किलोप्रमाणे) - टोमॅटो (४७) ३0-८0, वांगी (३६) ५0-१00, दोडका (३) १५0-२३0, भेंडी (११) २00-३५0, कारली (३) २00-२५0, हिरवी मिरची (२१) २00 ते २५0, भोपळा (२८) ६0 ते १२0, काकडी (३५) १00 ते २३0, शेवगा (४0) ७0 ते १५0. कोथिंबीर (१७३५0 जुड्या) १00 ते ३५0, मेथी (१४३२0 जुडी) १00-५00.
दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (७५) १६00 ते २000, ज्वारी (६) १८00 ते २३00, बाजरी (२) १५0१ ते १७0१, लिंबू (६५) ३३0-६३१.
केडगाव येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (२८५) १६५0 ते २१0१, ज्वारी (८६९) १६0१ ते २५0५, बाजरी (१४४) १३५१ ते २000, हरभरा (१११) ३८५0 ते४३00, मका (१0५) १३00 ते १५५0, तुर (१५) ६000 ते ६८00, लिंबू (१७५) ४00-८६0.
पाटस येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (१७) १५५१ ते १९00, ज्वारी (९) १४00 ते २३११, बाजरी (१४) १५00 ते २0५१, हरभरा (४) ४000 ते ४0५0, मका (२) १४५१ ते १४५१.
यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (२४) १५५१ ते २१२६, ज्वारी (५) १५५१ ते २४0१, बाजरी (५) १६00 ते २१0१, हरभरा (१) ३८११ ते ३८११, लिंबू (१७७) ४00 ते ८00.