डेक्क्न एक्सप्रेसला नवा साज ; सारथ्य महिलेच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 06:09 PM2020-03-05T18:09:04+5:302020-03-05T18:11:18+5:30
पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन एक्सप्रेसला नवे डबे लावण्यात आले असून या एक्सप्रेसची संपूर्ण जबाबदारी महिलांकडे साेपविण्यात आली हाेती.
पुणे : पुणे ते मुंबई या दाेन शहरांदरम्यान अनेक एक्सप्रेस धावतात. त्यात डेक्कन क्विन, प्रगती, सिंहगड, डेक्कन एक्सप्रेस प्रवाशांच्या पसंतीच्या आहेत. या एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाकडून नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन एक्सप्रेसला आता एलएचबी प्रकारातचे डबे लावण्यात आले आहेत. या डब्ब्यांचे उद्घाटन आज करण्यात आले.
पुण्याहून मुंबईला दुपारी 3.15 ला सुटणारी डेक्कन एक्सप्रेस मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी साेयीची अशी एक्सप्रेस आहे. या एक्सप्रेसचे डबे आता बदलण्यात आले आहेत. आत्याधुनिक आणि आरामदायी असे एलएचबी प्रकारातचे डबे आता या एक्सप्रेसला बसविण्यात आले आहेत. या नव्या प्रकाराच्या डब्यांसाेबत या एक्सप्रेसची पहिली फेरी पुण्याहून मुंबईला रवाना झाली. या काेचेसचे उद्घाटन रेल्वेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.
महिलादिन अवघ्या काही दिवसांवर असल्याने या एक्सप्रेसची सर्व जबाबदारी महिलांवर साेपविण्यात आली हाेती. एक्सप्रेसचा लाेकाे पायलेट आज एक महिला हाेती. त्याचबराेबर तिकीट चेकर, रेल्वे सुरक्षा विभागाचे कर्मचारी सुद्धा महिला हाेत्या. या एक्सप्रेसला असलेल्या महिला डब्यातील प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याचबराेबर या एक्सप्रेसच्या लाेकाे पायलट श्वेता तांबे यांचे औक्षण करण्यात आले. त्याचबराेबर त्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. एक्सप्रेसला हिरावा झेंडा देखील एका महिलेनेच दाखवला.