स्मार्ट फोनवर आॅनलाईन जुगाराचा नवा फंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:41 AM2018-11-27T01:41:15+5:302018-11-27T01:41:25+5:30
इंटरनेटचा वाढता वापर : आॅनलाईन लॉटरी, मटक्याचा तरुणांना विळखा
कुरकुंभ : बदलत्या तंत्रज्ञानानुसार मटका, जुगाराचेही स्वरूप बदलले आहे. कायद्याच्या पळवाटा शोधणाऱ्या यंत्रणांनी यावर चांगलाच तोडगा काढला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिले आहेत; मात्र याच स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात आॅनलाइन मटका, जुगार व पत्त्या खेळण्याºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सध्या प्रत्येक खेड्यापाड्यातदेखील आॅनलाइन लॉटरी, मटका, जुगाराचे अड्डे सहजरीत्या आढळून येतात. हातामधील स्मार्टफोनमध्ये देखील याचा वावर अगदी सहजपणे दिसून येतो. तर घरात असणाºया प्रत्येक टीव्हीवर देखील आॅनलाइन पत्ते खेळण्याच्या जाहिराती येतात. घरातील प्रत्येकाडे आज स्मार्टफोन आहेत. या स्मार्टफोनवर आॅनलाईन पद्धतीने मटका तसेच जुगाराचे अनेक अॅप उपलब्ध असून, याद्वारे मोठ्या प्रमाणात आज जुगार खेळला जात आहे. यावर कारवाई करण्यात अनेक अडचणी असल्यामुळे चोरटेही याचा वापर करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी इंदापूरसारख्या ठिकाणी बेकायदेशीर आॅनलाईन लॉटरीवर छापा टाकून कॉम्प्युटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली होती. अशा प्रकारे कारवाईचे प्रमाण अगदी नाममात्र आहे तरीही मोबाईल मधील आॅनलाईन जुगारावर काहीच नियंत्रण दिसून येत नाही. ग्रामीण भागात आॅनलाईन जुगारावर लाखोंची उलाढाल होत आहे. अगदीच वैयक्तिकरीत्या याचा वापर होत असल्याने यावर कारवाई कशी करणार, हा प्रश्न अनुत्तरित आहेत. एकीकडे वाढती बेरोजगारीचा भस्मासुर तरुण पिढीसमोर असताना अशा प्रकारच्या छुप्या गुन्हेगारी क्षेत्राकडे तरुण आपसूकच ओढला जात आहे .
कुरकुंभ हा औद्योगिक परिसर असल्याने येथील स्थानिक वगळता लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. अनेक व्यवसायांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे.
अनेक अवैधरीत्या चालणार्या व्यवसायांची नांदी
सध्या कुरकुंभ परिसरात होत असताना पोलिसांसमोर आता नवीन आव्हाने उभी राहत आहेत. त्यामुळे पोलिसांना देखील नवीन तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करून अशा प्रकारची गुन्हेगारी हाताळावी
लागणार आहे.
सध्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर तरुण पिढीचा वावर जास्त प्रमाणात होताना दिसून येतो आहे. तर कंपनी कामगार, छोटे व्यावसायिक यांची देखील संख्या लक्षणीय आहे. मोबाईलसारख्या वस्तूंवर इंटरनेटच्या माध्यमातून आकडेवारी पाहता येते. त्यामुळे तर शिक्षण काही नसले तरी मोबाईल चालवण्याच्या संखेत आणखीनच प्रमाण वाढले आहे. मोबाईलसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करताना अशा प्रकारे त्याचा गैरवापर रोखण्यासाठी यंत्रणा लवकर उभारणे हे सर्वांनाच एक आव्हान ठरणार आहे.